Bageshwar Dham : मोठी बातमी : बागेश्वर बाबांचा सत्संग सुरु असताना मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं? Video
Bageshwar Dham : बागेश्वर बाबांचा सत्संग सुरु असताना मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केलाय.
Bageshwar Dham, Bhiwandi : बागेश्वर महाराज (Bageshwar Dham) म्हणजेच धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba) आज (दि.4) भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ झालाय. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांवर लाठीचार्ज करण्याची वेळ आलीये. धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Baba) यांनी आपल्या भक्तांना अंगारा देण्याचे सांगितले. त्यांनी आधी महिलांना, त्यानंतर पुरुषांना एका रांगेत येण्याचे आवाहन केले. मात्र, काही वेळातच गर्दीचा ताण वाढत गेला, आणि अंगारा घेण्यासाठी लोक एकमेकांच्या अंगावरुन पुढे जात असल्याची स्थिती निर्माण झाली.
गोंधळ झाल्यानंतर बागेश्वर बाबांनी स्टेज सोडला
अधिकची माहिती अशी की, गर्दीचा ताण वाढल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला. काही महिलांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाजूला नेण्यात आले. यानंतर, धीरेंद्र शास्त्री यांनी परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून स्टेज सोडला. त्यानंतरही लोक स्टेजवर जाण्यासाठी धावले, ज्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अंगारा घेण्यासाठी भाविकांची धडपड
बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग मानकोली नाका येथे आयोजित करण्यात आला होता. शास्त्री महाराजांनी कथामधून भक्तांना प्रवचन दिले आणि नंतर भभूती वाटपाची घोषणा केली. यासाठी महिलांनी प्रथम रांग लावली, त्यानंतर पुरुषांनी. पण गर्दी एवढी वाढली की नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. लोक अंगारा घेण्यासाठी आक्रमक झाले, आणि एकमेकांमध्ये अंगारा घेण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. दरम्यान, यावेळी जवळपास उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांनी लोकांना बाहेर काढले आणि त्यांना स्टेजवर बसवले, बहुतेक महिलांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना एका बाजूला बसवण्यात आले होते.
गर्दी मर्यादेपलीकडे वाढल्याचे पाहून धीरेंद्र शास्त्री आपल्या स्टेजवरून उठले आणि यानंतर एकामागून एक लोक स्टेजवर चढू लागले त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी लोकांना हटवण्याचा प्रयत्न केला. अद्याप या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही...चगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा कसा प्रयत्न केला. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या