एक्स्प्लोर

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा भल्या पहाटे पंचनामा, 'आम्हालाही मारून टाका,' नातेवाईकांची भूमिका, एन्काऊंटरनंतर रात्री काय काय घडलं?

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला अक्षयचा चेहरा दाखवा अन्यथा आम्हालाही मारून टाका, अशी भूमिका घेतली.

मुंबई : बदलापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला होता, त्यानंतर आत्मसंरक्षणात्मक कारवाईत त्याचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. अक्षय शिंदेच्या या एन्काऊंटरनंतर राज्यातून सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. दरम्यान, अक्षय शिंदेवरील कारवाईनंतर 23 सप्टेंबरच्या रात्री खूप साऱ्या घडामोडी घडल्या आहेत. 

कळवा येथील रुग्णालयात मृतदेह

काल संध्याकळा साडे पाच वाजेच्या सुमारास मुंब्रा येथे अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळीबार केला. यात शिंदेचा त्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर अक्षय शिंदेचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठेवण्यात आली. 

रात्री न्यायाधीश उशिरा आले 

काल संध्याकाळापासून अक्षय शिंदे याचा मृतदेह  कळवा येथील रुग्णालयात होता. या घटनेचा पंचनामा करून अक्षय शिंदेचा मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात घेऊन जायचा होता. मात्र प्राथमिक माहितीनुसार न्यायाधीश उशिराने आल्यामुळे आले. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. त्यानंतर न्यायाधीश आल्यानंतर सकाळी साडे पाच वाजता मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिस अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना देणार आहेत. 

पोलीस आयुक्तांनी घेतली जमखी पोलीस अधिकाऱ्याची भेट

दुसरीकडे मध्यरात्री नंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करणाऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत डुंबरे यांनी जखमी पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी अशा सूचना दिल्या आहेत. 

अक्षयचं तोंड दाखवा अन्यथा आम्हालाही मारून टाका

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याचे कुटंबीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमच्या मुलाला बघू द्या, अशी मागणी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची केली होती. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. अक्षयचा मृतदेह जे. जे रुग्णालयात घेऊन जाणार आहेत, तेथे त्याचा मृतदेह पाहा, असे पोलिसांनी अक्षयच्या कुटुंबीयांना सांगितले. पोलिसांच्या या भूमिकेनंतर नातेवाईकांनी गोंधळ घातला. त्यानंतर नातेवाईक आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली. आम्हाला तोंड दाखवा नाहीतर आम्हाला पण मारून टाका असा आक्रोश आरोपीच्या आईने केला आहे.  

हेही वाचा :

Akshay Shinde Encounter : 15 दिवसांचे CCTV गायब, संस्थाचालक फरार अन् आता आरोपीचा एन्काऊंटर; 'बदलापूर'चं गुपित काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane  Police PC : अक्षय शिंदेंचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला, ठाणे पोलिसांची माहितीदुपारी 3 च्या हेडलाईन्स:  ABP Majha Marathi News : Headlines 3 PM Headlines : 24 September 2024Raj Thackeray Meet Salman Khan : सलमान खानच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचलेAkshay Shinde Encounter : फॉरेन्सिक टीम करणार एन्काऊंटर झालेल्या ठिकाणाची पाहणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा; भरत गोगावले यांची खरमरीत टीका
संजय राऊत यांचे डोकं फिरलय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा;भरत गोगावले यांची खरमरीत टीका
Amit Shah: 'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
'हे' मूळीच खपवून घेणार नाही, निवडणुकांसाठी भाजपची रणनीती; अमित शाहांचा मंत्र अन् सज्जड दम
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
परभणीतून अंतरवालीत जाणाऱ्या मराठा बांधवांना वडीगोद्री गावात अडवलं, मोठ्या तणावानंतर पोलिसांचा हस्तक्षेप
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
धुरळाच... सॅमसंगची मोठी घोषणा; 'बिग बिलियन डे'दिनी 9,999 मध्ये गॅलक्झी 5 जी स्मार्टफोन
Rain update : पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
पुण्यात दुपारीच मुसळधारा, कोकण, मराठ्यातही पावसाचा जोर; फळबाग अन् पिकांचं नुकसान
Akshay Shinde Encounter: कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
कुछ तो गडबड है दया... बदलापूर प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर की कट? सीआयडी करणार तपास
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
'राऊतांनीच उबाठा गटाचा एन्काऊंटर केलाय, त्याची सुपारी शरद पवारांनी दिली होती'; शिंदेंच्या सेनेचा पलटवार
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
मुंबईतील 'या' जागेसाठी फहद अहमद इच्छुक; महाविकास आघाडीतून जागा सोडण्याची मागणी
Embed widget