एक्स्प्लोर
मुंबईत 14 व्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू
मुंबई : मुंबईत वांद्र्यात 14 व्या मजल्यावरुन खाली पडल्यानं 21 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. नांदेडवरुन मुंबईत आपल्या आजीकडे आलेल्या मुलाचा काल रात्री खाली पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला.
सोहम बाळाते असं या चिमुकल्याचं नाव आहे. सोहमची आजी वांद्र्यातील सी-बर्ड या इमारतीत 14 व्या मजल्यावर राहते. त्यांची नांदेडमध्ये राहणारी मुलगी सोहमसोबत आईला भेटायला आली होती. शनिवारी रात्री आजी पूजा करत असताना खेळणाऱ्या सोहमचा तोल गेला आणि तो खिडकीतून खाली पडला. 14 व्या मजल्यावरुन पडल्यानं सोहमचा जागीच मृत्यू झाला.
14 व्या मजल्यावरुन खाली पडल्यानं सोहमला तातडीनं भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 21 महिन्यांच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement