एक्स्प्लोर

निवडणुकीच्या तोंडावरच औरंगाबाद नामांतराचा विषय का?; भाजप-शिवसेनेला राज ठाकरेंचा सवाल

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा सवालही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे.

नवी मुंबई : राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चर्चेत आहे. भाजप आणि मनसेनं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राज्यात सध्या महाविकासआघीडीचं सरकार आहे. परंतु, औरंगाबादचं नामांतरण करण्याच्या प्रस्तावासंदर्भात महाविकासआघाडीत बिघाडीचं चित्र दिसत आहे. राज्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने मात्र औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. अशातच औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांवर टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा सवालही यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेला केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "भाजप असो किंवा शिवसेना असो. ज्यावेळी केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता होती, तेव्हा नांमांतरण का नाही झालं? आज कसलं राजकारण करताय तुम्ही? इतर अनेक शहरांची नावं बदलली गेली. दिल्लीत तर रस्त्यांची नावं बदलली गेली. मग केंद्रात आणि राज्यात जेव्हा तुमचं सरकार होतं, त्यावेळी औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं? याचं उत्तर भाजपनंही द्यावं आणि शिवसेनेनंही द्यावं. लोकांना काय वेडे समजलात का? बरोबर निवडणुकांच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय आणायचा, केला का नाही तुम्ही इतकी वर्ष? थांबवणारं कुणीच नव्हतं. केंद्रात व राज्यातही तुम्हीच होता. तेव्हा हे विषय येत नाहीत. मग आताच कुठून आला? ते पण निवडणुका लागल्या लागल्या. मला असं वाटतं संभाजीनगरची जनता हुशार आहे. ते त्यांचा निर्णय योग्य घेतील आणि या लोकांचा योग्य समाचार देखील घेतील."

पाहा व्हिडीओ : Raj Thackeray | कृषी कायदा, रिहाना आणि मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे म्हणतात...

औरंगाबादच्या नामांतरावरुन मनसे आक्रमक

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यासाठी गुरुवारी मनसेनं शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली होती. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवण्यात आली. खैरे यांच्या अंगावर पत्रकं देखील भिरकावली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं, यासाठीचा वाद सुरु आहे. मनसेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी 26 जानेवारीचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मनसेकडून चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी खैरे यांनी मनसेची ही स्टंटबाजी असल्याचं म्हटलं तर मनसेनं देखील शिवसेनेला हे करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

चीन, पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही; शेतकरी आंदोलनावरुन राज ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget