एक्स्प्लोर
मुंबईतील मॉडेलची हत्या शरीरसंबंधांना नकार दिल्याने!
मानसीची शुद्ध हरपल्यामुळे मुझम्मील घाबरला. त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्नही केला.

मुंबई : मुंबईत 20 वर्षीय मॉडेल मानसी दीक्षितच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे 19 वर्षांचा आरोपी मुझम्मील सय्यदने मानसीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मानसीचा मृतदेह बॅगमध्ये कोंबलेल्या अवस्थेत सोमवारी मालाडजवळ खारफुटी जंगलात आढळला होता. मानसी रविवारीच राजस्थानमधील मूळ गावाहून परतली होती, तर सय्यदही काहीच दिवसांपूर्वी हैदराबादहून मुंबईत परत आला होता. हत्येच्या दिवशी मुझम्मील आणि मानसी पहिल्यांदाच भेटले. मुझम्मीलच्या अंधेरीतील घरी दोघांची भेट झाली. 'मानसीकडे सेक्स करण्याची मागणी केल्याचं आरोपीने कबुल केलं आहे. तिने नकार देताच त्याचा पारा चढला आणि त्याने तिच्या डोक्यात स्टूल घातलं' असं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे. 'मानसीची शुद्ध हरपल्यामुळे मुझम्मील घाबरला. त्याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्नही केला. तिला शुद्ध आली. पण इतक्यात आपली आई घरी येईल, या भीतीने त्याने दोरीने तिचा गळा आवळला. तिचा मृतदेह टाकण्यासाठी त्याने टॅक्सी बूक केली.' असं पोलिसांनी सांगितलं. 'आरोपी सतत आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे हत्येचं कारण स्पष्ट होईपर्यंत सखोल चौकशी करत आहोत. आपल्याकडे पुरावे आणि साक्षीदार आहेत.' असंही पोलिस म्हणाले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























