एक्स्प्लोर

Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम

Ashwini Bhide BMC : अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र नंतर हा विरोध मावळल्याचं दिसून आलं. 

मुंबई : सर्वाचंच लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अखेर अश्विनी भिडे यांची वर्णी लागली आहे. अश्विनी भिडे या मुंबई पालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असणार आहेत. भिडे आयुक्तपदी विराजमान झाल्या असल्या तरी त्यावरुन पडद्यामागे मोठं राजकारण रंगल्याचं दिसलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अश्विनी भिडेंच्या नावाला विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे भिडे यांनी सोमवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा विरोध मावळल्याची चर्चा आहे. या सगळ्या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

मुंबईचा विकास वेगवान व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या, मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण करणाऱ्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे आता पालिका आयुक्तपदी विराजमान झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांच्या निवडीने मुख्यमंत्र्यांचाच पालिकेवर वरचष्मा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पालिका आयुक्तपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर यांची देखील नावे चर्चेत होती. मात्र, या सर्वांना मागे टाकत अश्विनी भिडे मुंबई पालिका आयुक्त झाल्या आहेत. 

मुंबई पालिकेत महिलाराज! 

अश्विनी भिडे 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी

एमएमआरसीएलच्या प्रमुख म्हणून मुंबई 

मेट्रो-3 प्रकल्पामुळे ‘मेट्रो वुमन’ म्हणून समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव आणि अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून अश्विनी भिडे यांची ओळख

दरम्यान, मेट्रो कारशेडसाठी रात्रीतून झाडं तोडण्यात आल्यानं पर्यावरणवाद्यांकडून अश्विनी भिडेंना मोठा विरोध झाला होता. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर अश्विनी भिडेंची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. तर महायुतीचे सरकार आल्यानंतर एमएमआरसीएलची पुन्हा जबाबदारी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांच्याकडे देण्यात आली. 

उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून असीम गुप्ता यांच्या नावाला पसंती असल्याची चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्री हे अश्विनी भिडे यांच्या नावावरच ठाम असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालिका आयुक्तपदावरुन शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महापालिकेवर मुख्यमंत्र्यांचाच वरचष्मा कायम 

एमपीसीबीचे तत्कालीन सदस्य सचिव देवेंद्र सिंह यांचे सभागृहात निलंबन झाले होते. त्यांची पुन्हा एकदा वर्णी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळावर लागेल अशी चर्चा होती. मात्र, त्या ऐवजी राहुल रेखावार यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली. तर देवेंद्र सिंह यांना मुंबई पालिकेत सह पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली.

सातारा प्रकरणी उपसभापती गोऱ्हे यांचे निलंबनाचे आदेश बदलत चौकशी करण्याचे आदेश दिले गेले. दरम्यान, तुषार दोशींची चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला सारल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी भाजपला जे अपेक्षित होतं तेच झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. 

मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी आपल्या मर्जीतला अधिकारी असावा यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांची वर्णी लावली. दरम्यान, येत्या काळात मुंबईकरांच्या सेवेत अनेक मोठे प्रकल्प येणार आहे. ज्यात कोस्टल रोड, गारगाई धरण, पार्किंग आणि अंडरग्राऊंड प्रकल्पांचा समावेश आहे. अशात, अश्विनी भिडे यांच्या मागील कामाचा अनुभव बघता त्या या दृष्टीकोनातून उजव्या ठरतील. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना शह देताना पालिकेत आपला वरचष्मा देखील कायम ठेवल्याची चर्चा आहे. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget