एक्स्प्लोर
राक्षसरुपी शिवसेनेला बाटलीत बंद करा : आशिष शेलार
मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध टोकाला पोहोचलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची तुलना अप्रत्यक्षरित्या राक्षसाशी केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची फेरनिवड झाली. भाजपच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेलार यांनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.
महापालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकत नाही: मुख्यमंत्री
या मेळाव्यात आशिष शेलार यांनी महाभारतातील गोष्टीचा दाखला दिला. राक्षसावर वार करुन त्याच्यावर टीका करुन त्याला मोठा करु नका. तर त्याला बाटलीत बंद करा आणि दुर्लक्ष करुन संपवा, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेने आशिष शेलारांचा पुतळा जाळला एकीकडे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. परळ येथील कामगार मैदानावर बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शिवसैनिकांनी आशिष शेलार यांचा पुतळा जाळला. गेल्या काही दिवसात आशिष शेलार यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या वक्तव्यांना निषेध करत शिवसैनिकांनी शेलारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर, पक्ष मेळाव्यात निर्धार
भाजपचं 'मिशन 114' बईत 114 कमळ फुलवण्याचा निर्धार करुन भाजपनं मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारचं रणशिंग फुकलं आहे. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात भाजपच्या नेत्यांनी 'मिशन 114'ची घोषणा केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. गेल्या 15 वर्षापासून मुंबईची वाट लागली असून मुंबईतील सामान्य माणसासाठी भाजपला सत्ता हवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. आशिष शेलार यांचं भाषणअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement