आमचं पाहून काही लोकांनी शिवाजी पार्कात असे कार्यक्रम सुरु केले, आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला
Ashish Shelar : नाताळ आणि नववर्षासाठी मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील योगा गार्डन परिसरात प्रोमोनाडवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मुंबई : आम्हाला बघून काही लोकांनी शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) असे कार्यक्रम सुरु केले असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thacekray) यांना टोला लगावलाय. मनसेकडून दिवाळी निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात दिवाळीनिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा शिवाजी पार्क परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यावरच आता आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
नाताळ आणि नववर्षासाठी मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील योगा गार्डन परिसरात प्रोमोनाडवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याच सोबत कार्टर रोड परिसरात थ्रीडी दिव्यांची रोषणाई आलीये. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या इथे उद्घाटन सोहळा देखील पार पडला. त्यामुळे मुंबईकरांना 21 डिसेंबरपासून ते 2 जानेवारीपर्यंत इथे भेट देता येणार आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांनी कार्टर रोड परिसरात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
आशिष शेलारांनी काय म्हटलं?
मुंबईतलं पहिलं योगा पार्क आपण सुरु केलं. या गार्डनमधील दिवे हे पर्यावरणपूरक आहेत. तसेच ही विद्युत रोषणाई ही सोलार पॅनवरील आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदा अश्या पद्धतीची आकर्षक विद्युत रोषणाई ही भारतीय जनता पक्षाने केली. ही विद्युत रोषणाई बघून काही लोकांनी शिवाजी पार्कात अशाच प्रकारची विद्युत रोषणाई केली. मुंबईसाठी जे कोणी चांगलं करेल ते त्यांनी करायला हवं. ह्या नवीन वर्षात राम मंदिराचे उद्घाटन आणि निवडणुका आहेत. त्यामुळे या लाइट्स ऑफ होप असल्याचं यावेळी आशिष शेलारांनी म्हटलं.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
