एक्स्प्लोर
Advertisement
'उद्धट बोलण्यापेक्षा नम्रपणे माफी मागावी', शेलारांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
"उद्धट" भाषा बोलण्यापेक्षा ज्या प्रवाशांचे हाल झाले, संसार उघड्यावर आले. त्यांची नम्रपणे माफी मागावी आणि चुका दुरुस्त करायला लागावे! अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली.
मुंबई : काल (मंगळवार) दिवसभर पावसानं मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. त्यामुळे अनेकांनी पालिकेच्या कारभारावर निशाणा साधला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही यावेळी शिवसेनेवर तोंडसुख घेतलं.
मुंबईतील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली.
याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पत्रकारावर भडकल्याचं दिसून आलं. 'पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे?' असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांचा पारा मात्रा चांगलाचा चढला.
यानंतर आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अप्रत्यक्षपणे टीका केली. याबाबत त्यांनी अनेक ट्वीट केले आहेत.
— ashish shelar (@ShelarAshish) August 30, 2017'उद्धट' भाषा बोलण्यापेक्षा नम्रपणे माफी मागावी. असा सल्ला आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना दिला आहे.
नालेसफाई झाली असा "ढेकर" दिला.फोटो काढले.पण आता ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाले..त्यांचे काय करणार? — ashish shelar (@ShelarAshish) August 30, 2017'पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे? रस्त्यावर भाजपचे आमदार, नगरसेवक लोकांसाठी झटत होते. अर्थात कर्तव्य म्हणूनच!' असं ट्वीट करत शेलार यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला.
पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे? रस्त्यावर भाजपचे आमदार, नगरसेवक लोकांसाठी झटत होते.अर्थात कर्तव्य म्हणूनच! — ashish shelar (@ShelarAshish) August 30, 2017त्यामुळे आता आशिष शेलार यांच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement