एक्स्प्लोर
इंद्राणीला तुरुंगात फेशियल आणि मसाज मिळतो : आशिष शेलार
जेलमध्ये मृत्यू झालेल्या कैदी मंजुळा शेट्ये यांचं प्रकरण गाजत असताना, विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी दुसऱ्याच धक्कादायक बाबीकडे लक्ष वेधलं.
मुंबई: जेलमध्ये मृत्यू झालेल्या कैदी मंजुळा शेट्ये यांचं प्रकरण गाजत असताना, विधानसभेत भाजप आमदार आशिष शेलार यांनी दुसऱ्याच धक्कादायक बाबीकडे लक्ष वेधलं.
भायखळा कारागृहात आरोपी इंद्राणी मुखर्जीनं मसाज, फेशियल, पेडिक्युअर सारख्या सुविधा घेतल्याची शंका शेलार यांनी व्यक्त केली.
महत्वाचं म्हणजे या सर्व सुविधांसाठी मंजुळा शेट्ये यांची मदत घेतली गेल्याची चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे या सर्व प्रकरणावरही सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे.
मंजुळा शेट्ये यांच्या मृतदेहावर जखमा नव्हत्या असा पहिला खोटा अहवाल देणाऱया जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक््टरची चौकशी करण्यात येईल तसेच इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्युअर, फेशियल अशा सुविध मिळत होत्या त्यामध्ये मंजुळा शेट्ये यांचा काही सहभाग होता का ? या प्रकरणीही चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी विधानसभेत दिली.
मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंजुळा शेट्ये यांच्या मृतदेहावर कोणतीही जखमा नव्हत्या असा खोटा अहवाल जे जे. रुग्णलयातील कॅज्युलटी विभागाच्या डॉक्टरने दिला होता, त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. ती गृह राज्यमंत्र्यांनी मान्य केली.
याच चर्चेत पुढे आमदार अॅड आशिष शेलार यांनी एक धक्कादायक माहिती सभागृहासमोर आणली. ऑर्थर रोड कारागृहातील आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनीही या प्रकरणी न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले असून, इंद्राणी मुखर्जी या कारागृहात मसाज, पेडिक्युअर, फेशियल अशा सुविधा घेत होत्या. त्यामध्ये मंजुळा शेट्ये त्यांना मदत करत होती. त्यामुळे ही बाब सुध्दा गंभीर असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली. या प्रकरणीही तात्काळ चौकशी करण्याचे गृहराज्य मंत्र्यांनी मान्य केले. तसेच या प्रकरणी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱया वैद्यकीय अधिकाऱयावरही कारवाई करण्याचे गृहराज्य मंत्र्यांनी यावेळी मान्य केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement