एक्स्प्लोर
Advertisement
दररोज 3 तास सफाई, गाडगेबाबांचा खरा स्वच्छतादूत
मुंबईतला असाच कचरा साफ करण्याचं काम एक अवलिया गेल्या 4 वर्षांपासून करतोय.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटामाटात स्वच्छता अभियान सुरु केलं. अनेक नेत्यांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही केलं. पण फोटोसेशन संपलं आणि सावर्जनिक ठिकाणी पुन्हा कचरा दिसू लागला. मुंबईतला असाच कचरा साफ करण्याचं काम एक अवलिया गेल्या 4 वर्षांपासून करतोय.
अरुण पिराजी नागुंडे असं यांचं नाव. घाटकोपरच्या भटवाडीमध्ये हे राहतात. गेली चार वर्ष दररोज 3 तास हा अवलिया देशसेवेचं काम करतो आहे. घरची सगळी कामं उरकली, की ते साफसफाई करण्यासाठी निघतात. पंतप्रधान मोदींच्या नाही, तर संत गाडगेबाबांच्या आदर्शावर ते चालतात.
अरुणजी, तुम्हाला कधी घाटकोपर स्टेशनबाहेर झाडू मारताना दिसतील. तर कधी मेट्रो स्टेशनखाली कचरा उचलताना. तर कधी स्टेशनवर लोकांनी गुटख्याच्या पिचकाऱ्यांनी लाल केलेल्या जागा स्वच्छ करताना.
सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ करणाऱ्या अरुणजींना हे काम आणखी वाढवायचं आहे. मात्र यासाठी शासनानंही त्यांच्यापर्यंत पोहचणं गरजेचं आहे. तरच संत गाडगेबाबांनी सुरु केलेल्या कामाला बळ मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement