Monsoon | केरळमध्ये मान्सूनचं आगमन तर महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
केरळमध्ये मान्सूनचं जोरदार आगमन झालं आहे. यंदा सरासरीच्या 102% पाऊस होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिलीय. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुंबई : शेतकऱ्यांसह सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो मान्सून अखेर केरळात दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. विशेष म्हणजे हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणेच मान्सून केरळात दाखल झाला आहे. राज्यात मान्सून सात ते आठ जून रोजी दाखल हवामान विभागाचा आहे. मात्र, रविवारपासूनच मान्सनपूर्व पावसाने महाराष्ट्राला झोडपायला सुरुवात केली आहे. यावर्षी सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यावर्षी सर्वांसाठी समाधानकारक बाब म्हणजे मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे. यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडणार आहे. या विभानानुसार, देशातील उत्तर पश्चिम भागात 107 टक्के, 103% - मध्य भारताता, 102% - दक्षिण द्वीपकल्पात तर ईशान्य भारतात 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.
साताऱ्यात काल सायंकाळी झालेल्या पाऊसानंतर रात्री पुन्हा पाऊसाने चांगलाच धुडगुस घातला. सकाळच्या उघडीपनंतर पुन्हा अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी सुसाट वाऱ्याने पुन्हा अनेकांचे नुकसान केले. सकाळपासून पुन्हा सुरु झालेल्या पावसाच्या रिपरिपने सातारकर गारव्याचा आनंद घेत असताना दुसरीकडे महाबळेश्वरातही सकाळपासून रिपरिप सुरु झाली. या रिपरिपी सोबत रस्त्यांवर धुक्यांची चादर अनेक भागात पहायला मिळत आहे.
तिकडे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील काही भागात कालच्या मुसळधार पावसाने आणि गारपिटीने मोठे नुकसान झालंय. तर अन्य काही तालुक्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने काही घरांचे देखील नुकसान झालं. तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील बस्तवडे, गौरगाव, वायफळे, मांजर्डे या गावांना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान पाऊस व गारपिटीने झोडपले. ही गारपीट पंधरा मिनिटे सुरू होती. यामुळे आगाप द्राक्षबागांची छाटणी करून फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसत जखमा होत काड्या मोडल्या. तर पाने तुटून पडली. यामुळे या बागांना द्राक्षे न येण्याचा मोठा धोका आहे. या गारपिटीने शेकडो एकर क्षेत्र बाधीत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेली दोन वर्षे गारपिटीचा तडाखा तासगाव तालुक्यातल्या द्राक्षबागायतदारांना बसतो आहे.
#Monsoon मुंबईसह राज्यात पाऊस, वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. त्यामुळे समुद्र खबळले राहणार असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 4 जून पर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी, अशा सूचनाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केल्या आहेत.
तळकोकणात मान्सून पूर्व पावसाची रात्रीपासून संततधार सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच भागात पाऊस पडत आहे. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू होती. शिवाय पहाटेपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. यामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्या महिना भरापासून जाणवणाऱ्या उकड्यापासून मात्र जिल्हावासीयांची मुक्तता झाली.
मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी परभणी शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वत्र रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. शिवाय पहाटेपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. यामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळालाय. रात्री जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सेलु, गंगाखेडया तालुक्यात जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटा सह पाऊस झाला. तर जिंतुर, पुर्णा, पालम 3 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. तर, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाले.
Monsoon Forecast | यंदा मान्सून सामान्य राहणार; देशात सरासरीच्या 102 टक्के पावसाची शक्यता : आयएमडी