एक्स्प्लोर

सावधान! अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला, मच्छीमारांना प्रशासनाच्या धोक्याच्या सूचना, पावसाचा जोर किती राहणार ?

Mumbai Rain: त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.

Mumbai Heavy Rains: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर मंगळवारीही कायम असून समुद्र खवळलेला आहे. त्यातच समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड ,रत्नागिरी तसेच पुणे सातारानाशिकच्या घाटमाथ्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे . आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील तीन ते चार तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे .वादळी वाऱ्यांची शक्यता असल्याने सर्व मच्छीमारांना प्रशासनाने धोक्याच्या सूचना दिल्या असून सतर्कतेचा इशाराही दिलाय.

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसांच्या सरी कोसळत आहेत .किनारपट्टीवर ही जोरदार पाऊस सुरू आहे .वाऱ्याचा वेग वाढला आहे .मुंबईच्या समुद्राला उधाण आले आहे .भरतीची वेळ रात्री आठ 53 ची आहे आणि समुद्रात 3.14 मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे .

अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा वेग वाढला

अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी राहणार असून तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत (उत्तर महाराष्ट्र) तसेच ताशी 45 ते 55 कि. मी.राहणार असून ताशी 65 कि. मी.(दक्षिण महाराष्ट्र) वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून करण्यात आली आहे.

मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील कोकण किनारपट्टीवर 18 ते 22 ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीदरम्यान समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी 50 ते 60 कि.मी. राहणार असून तो प्रती ताशी 70 कि.मी.पर्यंत (उत्तर महाराष्ट्र)तसेच 45 ते 55 कि. मी. राहणार असून तो प्रति ताशी 65 कि. मी.(दक्षिण महाराष्ट्र) वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला आहे. या कालावधीत मच्छिमारांनी सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात जावू नये, अशी सूचना मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना करण्यात आली आहे. या कालावधीत वित्त व जीवित हानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था, नौका मालक यांना याबाबत सूचित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

ज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. त्यातच समुद्र खवळलेला असून वाऱ्याचा वेग प्रति तास 50 ते 60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. काही भागात तो 70 किमी/ता. (उत्तर महाराष्ट्र) तर 65 किमी/ता. (दक्षिण महाराष्ट्र)पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. 18 ते 22 ऑगस्टदरम्यान वादळी वारे राहणार असल्याने सर्व मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
मुंबई पालिकेतील मोकळ्या जागेत मद्याच्या बाटल्या, गटारी अमावास्येनंतर मुख्यालयातील धक्कादायक प्रकार समोर
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget