एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सचिन वाझेला राजकीय वरदहस्तामुळेच सेवेत परत घेतलं, हे स्पष्ट- CBIचा आरोप

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणं, अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि परमबीर यांचे आरोप हे सारं एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याशी संबंधित या प्रकरणाची कागदपत्र तपासणं हे या तपासाचाच भाग आहे. असा दावा सीबीआयच्यावतीनं करण्यात आला.

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला फोन टॅपिंगबाबतचा अहवाल लीक कसा झाला?, किंवा तो का केला गेला?, याची राज्य सरकार चौकशी करतंय मात्र त्यातून काय माहिती समोर आली?, काय डेटा सापडला?, याबाबत सोयीस्कररित्या कोणतीही चौकशी न करताच ती फाईल बंद करण्यात आली. परमबीर सिंह यांच्या पत्रात याचाही उल्लेख आहे. त्यामुळे याचीही चौकशी होणं आवश्यक आहे. असा दावा सीबीआयच्यावतीनं देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सोमवारी हायकोर्टात केला. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणं, अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि परमबीर यांचे आरोप हे सारं एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याशी संबंधित या प्रकरणाची कागदपत्र तपासणं हे या तपासाचाच भाग आहे. असा दावा सीबीआयच्यावतीनं करण्यात आला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा आणि त्या एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्यावतीनं  हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या सुनावणीत प्रामुख्यानं सीबीआयचा युक्तिवाद झाला. ज्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या याचिकेवर तीव्र आक्षेप घेतला. 

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेतानाची कागदपत्र सीबीआयला हवीत, मात्र राज्य सरकारचा त्याला इतका विरोध का?, वाझेला आता सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. तो सध्या एनआयएच्या केसमध्ये मुख्य आरोपी आहे. तसेच हे प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याशी थेट संपर्क ठेवण्याचं कारणच काय? याचा तपास होणं आवश्यक आहे. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलात एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होता. पॉईंट ब्लँकवर त्यांनी 60 हून अधिक एंकाऊंटर केलेत, यातील काही प्रकरणांत स्वत: राज्य सरकारनं चौकशी केलीय.

15 वर्ष निलंबित राहिल्यानंतर सचिन वाझेंचा सेवेत पुन्हा आल्यावर त्यांचा पोलीस दलात जसा वावर होता, त्यानुसार त्यांची पुनर्नियुक्ती ही राजकीय वरदहस्तानंच झाल्याच स्पष्ट होतंय. असा थेट आरोप सीबीआयच्यावतीनं करण्यात आला. 15 वर्ष सेवेबाहेर असूनही पुन्हा सेवेत येताच वाझेंना महत्वाचं पद देण्यात आलं. मुंबई पोलीस तपास करत असलेल्या अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांत वाझेचा थेट सहभाग होता. हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, त्यामुळे त्याचा तपास होत असताना राज्य सरकारनं आक्षेप घ्यायचं कारणचं काय?, उलट प्रत्येक राज्यानं केंद्रीय तपास यंत्रणेला सहकार्य करायल हवं. म्हणूनच सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतलेल्या कमिटी कोण कोण होतं? असा सवाल यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला. यावर याचीच माहिती आम्ही मागितली आहे, मात्र राज्य सरकार यासंबंधित कागदपत्र द्यायला तयार नाही. पण त्यात परमबीर सिंह आणि अन्य दोन व्यक्ती होत्या, अशी प्राथमिक माहिती असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं.

याप्रकरणी मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांनीही सोमवारी आपला युक्तिवाद केला. राज्य सरकारची ही याचिका अयोग्य असल्याचा डॉ. जयश्री पाटील यांनी दावा करत ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली. दरम्यान डॉ. पाटील यांनी सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहिलेली एक चिठ्ठी कोर्टासमोर वाचून दाखवली. ज्या पत्रात वाझेंनी अनिल देशमुखांवर वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केलाय. त्यामुळे सचिन वाझेलाही यात प्रतिवादी करण्याची मागणी हायकोर्टात करण्यात आली. मात्र राज्य सरकारनं या मागणीला विरोध केला. या पत्राचा इथं काहीही संबंध नाही, हे पत्र हायकोर्टापुढे नाही. तसेच हे पत्र एनआयए कोर्टानंही रेकॉर्डवर घेतलेलं नाही. असं राज्य सरकारच्यावतीनं ज्येष्ठ वकील रफिक दादा यांनी हायकोर्टाला सांगितलं. बुधवारी याच प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर युक्तिवाद सुरू होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MarakadWadi Repolling | मारकडवाडीत मतदान मागे, नागरिकांवर पोलिसांचा दबाव, जानकरांचा आरोपABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
समीर भुजबळांनंतर सुहास कांदेंचं नेक्स्ट टार्गेट छगन भुजबळ? नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून वादाचा नवा ड्रामा सुरु
Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंग रद्द
Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांना लॉटरी, 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होणार नाही; 'या' नेत्याचा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर निशाणा
Baba Venga : 2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; आर्थिक स्थिती उंचावणार, बाबा वेंगांचं भाकित
2025 मध्ये 'या' 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, बाबा वेंगांचं भाकित
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
Embed widget