Anil Deshmukh : अनिल देशमुख उपचारासाठी जे जे रुग्णालयात; कारागृहात पडल्याने खांद्याला मार, लवकरच शस्त्रक्रिया
Anil Deshmukh Health News Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची खांद्याची लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

Anil Deshmukh Health News Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांची खांद्याची लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला आहे. त्यामुळं अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
जे जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं आहे की, अनिल देशमुख यांना शनिवारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते अस्थिव्यंग विभागात दाखल आहेत. आज त्यांचा एमआरआय येईल. त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल, असं सापळे यांनी सांगितलं आहे.
सीबीआयला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांचा ताबा आता सीबीआयला (CBI) देण्यात आला आहे. मात्र देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ईडीच्या (ED) तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता. त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयचा हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनंच सीबीआयनं यांची कारागृहात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळेच केंद्रीय तपासयंत्रणेनं या चौघांचीही कस्टडीत चौकशी करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज केला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
संबंधित बातम्या
Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या जामीनावर 8 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
