एक्स्प्लोर

सहप्रवाशी अश्लील चाळे करु लागल्यानंतर महिलेने धावत्या रिक्षातून मारली उडी, अंधेरीतील घटना, दोघांना अटक

Andheri Mumbai: मुंबईतील अंधेरी येथे रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे करत असताना महिलेने रिक्षातून उडी मारली. या महिलेने अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याचा सहकाऱ्याला अटक केली आहे.

मुंबई :  मुंबईतील अंधेरी येथे रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेसोबत अश्लील चाळे करत असताना महिलेने रिक्षातून उडी मारली. यात महिला जखमी झाली आहे. या महिलेने अंधेरी पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याचा सहकाऱ्याला अटक केली आहे. अनिकेत जैस्वाल, सूरजकुमार राजभर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. माहितीनुसार पीडित महिला गुंदवली सर्व्हिस रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी येथून ऑटोरिक्षाने मालाडला जाण्यासाठी प्रवास करत होती. त्यावेळी रिक्षात मागे बसलेल्या रिक्षाचालकाचा मित्र असलेल्या व्यक्तिने पीडित महिलेची छेड काढण्यास सुरूवात केली. 

त्यावेळी या महिलेने रिक्षा थांबवण्यास सांगितले असता रिक्षाचालक हा मागे बसलेल्या त्याच्या मित्राच्या सांगण्यावरून रिक्षा न थांबवता पुढे जाऊ लागला. त्यावेळी पीडित महिलेने धावत्या रिक्षामधून खाली उडी मारली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला, हाताला दुखापत झाली. सदर घटनेबाबत या पीडित महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून  तपासादरम्यान फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले. तसेच  घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरामधून संशयित ऑटोरिक्षाचे वर्णन व क्रमांक प्राप्त केले. तपास करुन या दोन्ही आरोपींना  समतानगर पोलिस ठाणे हद्दीतून ताब्यात घेतले. 

चौकशीमध्ये आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अनिकेत जैस्वाल, सूरजकुमार राजभर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. यातील अनिकेत जैस्वाल याच्या विरोधात समता नगर पोलीस ठाण्यात या आधीही गुन्हे दाखल आहेत. तसेच यापूर्वी त्याने लहान मुलीवर अत्याचार सुद्धा केल्याचा गुन्हा दाखल आहे, अशी माहिती झोनचे डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget