एक्स्प्लोर
दररोज 21 किमी चालणं, 5 तास व्यायाम, अनंत अंबानीचे खडतर परिश्रम
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अनंत अंबानी म्हटल्यावर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या सामन्यात दिसणारा चेहरा. मैदानाबाहेर एका सोफ्यावर बसलेला लठ्ठ मुलगा. त्याच्या लठ्ठपणाची अनेक जण थट्टा करत. अनंतने ही थट्टा मनावर घेतली पण चांगल्या अर्थाने. त्याने बोलण्यातून नाही तर कृतीतून थट्टा करणाऱ्यांना उत्तर दिलं. 20, 40 किंवा 50 किलो नाही तर अनंत अंबानीने तब्बल 108 किलो वजन कमी करुन अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली.
अनंतचा संकल्प
21 व्या वाढदिवसापर्यंत वजन कमी करण्याचा संकल्प त्याने केला होता. अनंत अंबानीने 18 महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर 108 किलो वजन कमी केलं. लठ्ठ अनंत ते फिट अनंत हा बदल तसा सोपा नव्हता. यासाठी त्याने घेतलेली मेहनत अतिशय खडतर होती. त्याने दररोज 5 तासांचा व्यायाम करुन त्याने 108 किलो वजन कमी केलं.
क्रोनिक अस्थमामुळे वजन वाढलं
अनंत अंबानीला क्रोनिक अस्थमा नावाचा आजार होता. या आजारावरील गोळ्यांमुळे त्याचं वजन अनिर्बंध वाढलं होतं. मात्र यानंतर तो वजनाबाबत अतिशय जागरुक झाला आणि वजन कमी करण्याचा निश्चय केला.
व्यायामाचं शेड्यूल आणि आहार
वजन कमी करण्यासाठी अनंत मागील 18 महिन्यांपासून प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने आहारावर कडक नियंत्रण ठेवलं. तो रोज 5 ते 6 तास व्यायाम करत असे. योगासनं झाल्यानंतर 21 किमी चालायचा. खाण्यात साखर पूर्णपणे वगळली. कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात आणि आवश्यक त्या प्रमाणात फॅटस् तसंच प्रोटीनचा आहारात समावेश केला होता.
वजन घटवण्यात अमेरिकन ट्रेनरची मदत
अमेरिकन ट्रेनरच्या देखरेखीखाली अनंतने कठोर मेहनत घेतली. त्याने गुजरातच्या जामनगरमधील रिलायन्सच्या रिफायनरीमध्ये ट्रेनिंग घेतली. ट्रेनिंगदरम्यान त्याने खूप घाम गाळला. धावणं, योगा, कार्डिओ एक्झरसाईजच्या मदतीने वजन कमी केलं.
अनंतचं नवं रुप पाहून अनेक जण आश्चर्यचकित
काही दिवसांपूर्वी अनंत कुटुंबीयांसह गुजरातच्या सोमनाथ मंदिरात गेला होता. तिथे अनंतचं नवं रुप पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता बारीक झालेल्या अनंत अंबानीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement