Devendra Fadnavis Birthday : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस, अमृता फडणवीस यांच्या खास शुभेच्छा
Devendra Fadnavis Birthday : देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटद्वारे खास शुभेच्छा दिल्या आहेत. हे ट्वीट करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जिलेबी भरवतानाच फोटो शेअर केला आहे.
Devendra Fadnavis Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा आज 52 वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. "अडथळ्यांची शर्यत पार करत त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत, कायम विकासाचा गोडवा पसरवणारे देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हे ट्वीट करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जिलेबी भरवतानाच फोटो शेअर केला आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते.
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 22, 2022
अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !#Devendra_Fadnavis pic.twitter.com/bHtz03Eo9Q
देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज वयाची 52 वर्षे पूर्ण करत 53 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूर इथे झाला. महाविकास आघाडीच्या काळात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. तर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती. वयाच्या 27व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. देवेंद्र फडणवीस हे अभाविपचे सक्रिय सदस्य होते. तर वयाच्या 44 व्या वर्षी शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. 31 ऑक्टोबर 2014 रोजी मुंबईली वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. महाराष्ट्रात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीसांना मिळाला. 23 नोव्हेंबर 2019 रोजी मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या तीन दिवसातच म्हणजे 26 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अडीच वर्षांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेत येईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
संबंधित बातम्या