एक्स्प्लोर

Worli Hit And Run Case: 'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'

Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case:  वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे ती महिला ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी आहे. 

Jaywant Wadkar On Worli Hit and Run Case:  मुंबईचा रविवार हा एका धक्कादायक घटनेमुळे हादरुन गेला. मुंबईतील वरळी परिसरात एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील या हिट अँड रन (Worli Hit and Run Case) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. वरळीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) उपनेत्याच्या मुलानं महागड्या गाडीनं महिलेला चिरडलं. कावेरी नाखवा असं या महिलेचं नाव आहे. ज्या महिलेला त्यानं चिरडलं, ती महिला अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची सख्खी पुतणी आहे. 

या अपघातानंतर जयवंत वाडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. वरळी हिट अॅन्ड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे. मिहिर हा मागील 24 तासांपासून फरार असून आता त्याने परदेशात पलायन केल्याचंही म्हटलं जातंय. पण या अपघातामुळे जयवंत वाडकरांनी त्यांच्या लेकीला गमावलं. 

जयवंत वाडकरांनी काय म्हटलं?

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयवतं वाडकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं पाहिजे की, 'यावर एक कठोर कायदा काढून फाशीची शिक्षा द्यायला हवी. ज्या विकृत पद्धतीने हे घडलं आहे, त्याची जाणीव त्या माणसाला सुद्धा झाली पाहिजे. त्यामुळे त्याला शिक्षाही तशीच व्हायला हवी. आपल्या गाडीसमोर साधा उंदिर जरी आला तरी आपण गाडी थांबवतो, आज एखादी व्यक्ती आपल्या गाडीसमोर येते आणि तिला फरफटत घेऊन जाणं ही किती वाईट गोष्ट आहे. त्यानंतर तिथेच गाडी सोडून पळून जाणं हे जास्त वेदनादायक आहे. मी सरकारला विनंती करतो की, त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नका.'

 'तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. तो रात्री बारमध्ये दारु प्यायला, अठरा हजारांचं बिल त्यानं केलं. त्यावेळी ती मर्सिडीज गाडी होती, मग ही गाडी बीएमडब्ल्यू कुठून आली?  त्याची मैत्रीण कोण आहे?' असे अनेक सवालही जयवंत वाडकरांनी यावेळी उपस्थित केले आहेत. पुढे त्यांनी म्हटलं की, 'सरकारने एकालाही सोडता कामा नये. आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते योग्य ती कारवाई करतीलच.' 

'गणपतीमध्ये आता पोरीची खूप आठवण येईल'

 ज्या महिलेचा मृत्यू झाला ती माझी सख्खी पुतणी आहे. त्यामुळे आता यावर काय बोलू मला काहीच कळत नाहीये. त्या पोरीचा आता मला गणपतीमध्ये खूप आठवण येईल. गणपतीसाठी दादरवरुन फुलं आणणं, सजावट करणं या सगळ्या गोष्टी खूप आठवणीत राहतील. गणपतीमध्ये आरती झाली की मी बऱ्याचदा तिला तिच्या वरळीच्या घरी सोडायचो आणि त्यानंतर पुढे माझ्या घरी जायचो. त्यावेळी मला सतत तिची आठवण येईल, असं म्हणत जयवंत वाडकरांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

ही बातमी वाचा : 

Salman Khan : ना कतरिना, ना ऐश्वर्या, 'या' अभिनेत्री होणार होतं भाईजानचं लग्न; पत्रिकाही वाटल्या पण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget