एक्स्प्लोर

Shivaji Maharaj Statue : 'शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं जगभरात महाराष्ट्राची लाज निघालीय', हायकोर्टात याचिका दाखल

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पीडब्ल्यूडी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

मुंबई : मालवणजवळील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं जगभरात महाराष्ट्राची लाज निघाली आहे. तसेच हे सरकार दिशाभूल करणारा गुन्हा नोंदवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असा गंभीर आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली. या घटनेसाठी नौदलाचे संबंधित अधिकारी व मालवण पीडब्ल्यूडीचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यामुळे या सरकारी अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा हा भव्य पुतळा 26 ऑगस्टला दुपारी 1 च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. याची निर्मिती करणाऱ्या डिझायनर व कंन्सल्टिंग एजन्सीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मालवण येथील पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनीच हा गुन्हा नोंदवलाय. 

समुद्र किनारी वाहणाऱ्या बेफान वाऱ्याचा अंदाज न घेताच नौदल अभियंते व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवलाच कसा?, त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करत आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपााध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

काय आहे याचिका?

धोका असल्याचं माहिती असूनही योग्य ती काळजी घेतली गेली नाही. पुतळ्याच्या स्क्रू व नटला गंज लागल्याचं स्थानिकांनी अधिका-यांना सांगितलंही होतं. त्याची माहिती डिझायनरसह नौदल अधिकाऱ्यांनाही दिली गेली होती, असे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी एफआयआरमध्ये नमूद केलेलं आहे. याचा अर्थ पुतळ्याला धोका आहे हे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच माहिती होतं. तरीही त्यांनी पुतळ्याची काळजी घेतली नाही, असा  आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

अशिक्षित व गरजूंसाठी एखादा बेजबाबदार बिल्डर जशी चाळ बांधतो त्याचप्रमाणे सात महिन्यांंत हा पुतळा तयार करण्यात आला. आणि उद्घघाटन होऊन अवघ्या नऊ महिन्यात पुतळा कोसळला, असा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ, व्हीजीटीआय अथवा बॉम्बे आयआयटीचे इंजिनिअर यांची एक समिती तयार करून या घटनेची योग्य ती चौकशी करावी. तसेच तीन वर्षांत तिथं योग्य त्या उंचीचा नवा पुतळा तयार करावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसेच मालवण पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या गुन्ह्याचा तपास पुणे सीआयडीकडे वर्ग करावा. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष पथकाची स्थापना करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आलीय.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषणSandeep Deshpande Worli Speech:वरळीसाठी स्पेशल DCR असायला हवा; राज ठाकरेंसमोर देशपांडे स्पष्टच बोललेRaj Thackeray Vision Worli : वरळी माझ्या परिचयाचा भाग, बाळासाहेबांसोबत अनेदा आलोयRaj Thackeray Vision Worli : तुम्ही मुंबईचे मालक, रडता कशाला? राज ठाकरेंची कोळी बांधवांना साद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरंपचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Rishabh Pant : रिषभ पंतनं केली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटीमध्ये गाठला मोठा टप्पा
रिषभ पंतकडून महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, केवळ 34 कसोटी सामन्यांमध्ये गाठला टप्पा
Atishi CM मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Video : मै आतिशी... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा महिला; शपथविधीनंतर केजरीवालांचे चरणस्पर्श
Tirupati Laddu Controversy : पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
पडद्यावरचे नायक सोशल मीडियात भिडले! पवण कल्याण यांच्या 'त्या' मागणीवर जयकांत शिक्रेंचा 'सिंघम' स्टाईलने खोचक टोला
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
काय सांगता, 2 लाखांत IPS ची वर्दी अन् बंदूकही; बोगस अधिकाऱ्याचा असा झाला पर्दाफाश
Embed widget