देशात काय होईल ते माहिती नाही, पण मोदींचा घोडा महाराष्ट्र थांबवल्याशिवाय राहणार नाही; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं भाजपला चॅलेंज
Lok Sabha Election : हे मुंबईला लुटायला आले आहेत, त्यांना थांबवण्यासाठीच ही लोकसभा निवडणूक असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर म्हणाले.
![देशात काय होईल ते माहिती नाही, पण मोदींचा घोडा महाराष्ट्र थांबवल्याशिवाय राहणार नाही; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं भाजपला चॅलेंज Sachin Ahir slams bjp narendra modi over maharashtra issue north east mumbai lok sabha election politics marathi देशात काय होईल ते माहिती नाही, पण मोदींचा घोडा महाराष्ट्र थांबवल्याशिवाय राहणार नाही; ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं भाजपला चॅलेंज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/18/70ce28fe5bf1b71d52c5fd2c2b17a348171345802742093_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आतापर्यंत जे अशक्य दिसत होतं ते शक्य करण्याचे काम आपण दोन्ही पोटनिवडणुकीत केलं, पुण्यात धंगेकरांच्या रूपाने आपण भाजपचा गड पाडलाय, त्यामुळे सर्व्हे काहीही होवो, देशात काय होतंय ते माहिती नाही, पण महाराष्ट्र मात्र मोदींचा घोडा थांबवल्याशिवाय राहणार नाही अस वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केलं. कोण असली आणि कोण नकली हे शिवसैनिकांनी आपल्या मतपेटीच्या यांना दाखवून द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं.
ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. त्यामध्ये तीनही पक्षातील नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. हे मुंबईला लुटायला आले आहेत, यांना थांबवण्यासाठीच ही लोकसभा निवडणूक असल्याचं सचिन अहिर म्हणाले.
कोण असली, कोण नकली हे शिवसैनिक दाखवतील
सचिन अहिर म्हणाले की, भाजपने या आधी सांगितलेल्या जाहीरनाम्यातील किती गोष्टी पूर्ण केल्या. गेल्या 10 वर्षात त्यांनी लोकांना काय दिलं? ते लोकांना 15 लाख देऊ शकलो नाहीत. हे अपयश झाकण्यासाठी राज्यात यायचं, असली आणि नकलीची चर्चा करायची एवढेच उद्योग सुरू आहेत. आता शिवसैनिकांना मतपेटीच्या रुपाने कोण असली आणि नकली हे यांना दाखवावं लागेल.
चार सीट वाल्यांना 40 ठिकाणी प्रचार करावा लागतोय
गुजरातची म्हण इकडे सांगण्याचा प्रयत्न होतोय. अमित शाह इकडे आले आणि तीन तिघाडा काम बिघाडा असं येऊन बोलले, मात्र मराठीत एक म्हण आहे. तीन तेरा, नऊ बारा. आता तुमचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही. तोडफोडीचं राजकारण त्यांना करावं लागतंय. चार सीट वाल्यांना 40 ठिकाणी प्रचार करावा लागतोय.
मुंबईत दोन उमेदवार गुजराती
मुंबईत सव्वा दोन लाख गुजराती समाज आहे. भाजपनं दोनच उमेदवार जाहीर केलेत, एक मिहिर कोटेचा आणि एक पियुष गोयल. महाजन कुटुंबीयांना उमेदवारीसाठी थांबावं लागतंय. एकाच समाजातील लोकांना उमेदवारी दिली जातेय.
मुंबईत यावं आणि आम्हाला बोलून जावं हे सहन केलं जाणार नाही
मुंबईत कोणीही यावं आणि आम्हाला बोलून जावं हे सहन केलं जाणार नाही. एक बाई आली आणि मुंबईचा पाकिस्तान केला असं म्हणाले. तिलाच आता संसदेत पाठवण्याची तयारी भाजप करत आहे. मुंबई लुटायला आलेले आहेत, त्याला थांबवण्यासाठी ही लोकसभा महत्त्वाची आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे स्मारक अजूनही का तयार होऊ शकले नाही असा प्रश्न सचिन अहिर यांनी विचारला. खरी लढाई ही अस्मितेची लढाई आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवणं म्हणजे उद्धव ठाकरेंचे हात मजबूत करणं आहे असंही ते म्हणाले.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)