एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MNS Protest On Toll : टोल नाक्यावरून विना टोल वाहने सोडणाऱ्या मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड; पोलीस ठाण्यात रवानगी

Raj Thackeray On Toll Plaza : मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मुंबई/ वाशी :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोलबाबत (Toll) घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मनसैनिकांनी (MNS supporters) टोल नाक्यावर उभे राहत चार चाकी वाहने सोडली. त्यानंतर पोलिसांनी मनसैनिकांची पोलिसांनी धरपकड केली. वाशी आणि दहिसर टोल नाक्यावरून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत टोलच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. वाहन चालकांना टोल न देण्याचे आवाहन राज यांनी केले. ज्या टोल नाक्यावरून टोल घेतला जाईल, तो टोल नाका पेटवून देण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिकांना टोल नाक्यावर जात वाहने टोलशिवाय सोडण्यास सुरुवात केली. 

मनसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलिसांनी परिस्थिती चिघळू नये यासाठी टोल नाक्यावर धाव घेतली. वाशी टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.  मनसेच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांना वाशी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेले. 

तर, दुसरीकडे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर टोल  नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. या ठिकाणाहून 20 ते 25 मनसे कार्यकर्त्यांना दहिसर पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दहिसर पोलिसांना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी चार चाकी वाहनांच्या टोल माफीबाबत केलेल्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप दाखवली. मात्र, प्रत्यक्षात दहिसर टोल नाक्यावर चार चाकी गाड्यांचा टोल घेतला जात होता. 

राज ठाकरे काय म्हणाले? 

महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी "देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू"

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? 

जी घोषणा आम्ही टोलमुक्तीची केली होती, त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर छोट्या गाड्यांना त्यांना आम्ही मुक्ती दिली आहे. केवळ व्यावसायिक वाहनांकडूनच आम्ही टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget