Mumbai Monorail Stuck: 582 लोकांनी खचाखच भरलेली मोनोरेल अचानक बंद का पडली? समोर आलं महत्त्वाचं कारण
Mumbai Monorail Stuck: मुंबईत मोनो रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अखेर 2 तासांनी सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर 582 प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली.

Mumbai Monorail Stuck: तीन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. अशातच मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास चेंबूर ते वडाळादरम्यान एक मोनोरेल बंद पडली. मोनोच्या (Monorail Stuck) लाईट्स गेलेल्या, तर मोनो एका बाजूला कलंडलेली. लाईट्स गेल्यानंतर मोनोमधला एसी बंद झाला आणि आत असलेले 582 प्रवासी गुदमरले. क्रेनच्या मदतीनं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. यातील काही प्रवाशांना बंद एसी आणि गर्दीमुळे अस्वस्थ वाटू लागलं होतं. पण, सुदैवानं वेळीच सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
मुंबईतील चेंबूर ते भक्तीपार्कदरम्यान काल (मंगळवारी) घडलेल्या प्रकारानंतर आज (बुधवारी) फारच कमी लोकांनी मोनोरेलचा वापर केलेला दिसतोय. अगदी तुरळक लोक मोनोनं प्रवास करताना दिसत आहेत. मुंबईत तुफान पाऊस सुरू असतानाच मंगळवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास चेंबूर ते वडाळादरम्यान एक मोनोरेल बंद पडली. या मोनोरेलमधील एसी बंद झाल्यानं प्रवासी गुदमरले. क्रेनच्या मदतीनं दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं.
नेमकं घडलं काय?
मुंबईत भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनीदरम्यान मोनो रेल्वे बंद पडल्याची घटना काल घडली होती. त्यानंतर तब्बल दोन तासांनंतर क्रेनच्या मदतीनं 582 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं होतं. या मोनो रेल्वेत क्षमतेपेक्षा अधिकची गर्दी झाल्यामुळे रेल्वेवर अतिरिक्त भार आला. त्यामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातला संपर्क तुटला, आणि वीजपुरवठा खंडीत झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पण, असं झालंच कसं? वीजपुरवठा अचानक कसा खंडित झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याची कारणं आता प्राथमिक तपासात समोर आली आहेत.
मोनो रेल का ठप्प झाली?
- मोनोरेल भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यानची मैसूर कॉलनी स्टेशनजवळ बंद पडली
- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्यामुळं मोनोरेल बंद
- मोनो रेलची क्षमता 104 टनांची, काल दुर्घटनेवेळी 109 टन वजन
- मोनो रेलमध्ये दुर्घटनेवेळी क्षमतेपेक्षा पाच टन अधिक होतं
- वजन वाढल्यामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टरचा संपर्क तुटला
- पॉवर रेल आणि करंट कलेक्टरचा संपर्क तुटल्यानं वीजपुरवठा खंडीत
वीजपुरवठा अचानक कसा खंडित झाला?
मोनोरेल अचानक बंद झाल्याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एका वळणावर करंट कनेक्टर आणि आणि पावर विल यांचा संपर्क तुटला आणि करंट नसल्यानं इमर्जन्सी ब्रेक लागला. ट्रेनमध्ये पावर टेल आणि करंट कनेक्टर शु याचा संपर्क तुटला आणि सेफ्टी प्रोटोकॉलमध्ये संपर्क तुटला.
प्राथमिक तपासात असं आढळून आलं की, क्षमतेपेक्षा अधिक गर्दीमुळे मोनोरेलचं एकूण वजन सुमारे 109 मेट्रिक टनांपर्यंत वाढलं, जे तिच्या मूळ क्षमतेपेक्षा अधिक होतं. मोनोची एकूण क्षमता 104 टन आहे. या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील यांत्रिक संपर्क तुटला. ज्यामुळे मोनोरेलसाठी अत्यावश्यक असलेला वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे मोनो बंद पडली. दरम्यान, मागील वर्षी पासून अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा मोनोरेलला केला जातो. याआधी टाटा पॉवरकडून हा वीजपुरवठा केला जात होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























