News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मॅकडोनल्ड्समध्ये भारतीय चव, मसाला डोसा बर्गर ते अंडा भुर्जी

FOLLOW US: 
Share:
मुंबई : 'आय अॅम लव्हिन् इट!' अशी टॅगलाईन असलेलं मॅकडोनल्ड्स हे चेन रेस्टॉरंट बर्गर आणि फ्राईजने भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरवतात. मात्र आता या पाश्चात्य बर्गरमध्ये भारतीय चव सामावणार आहे. मॅकडी लवकरच मसाला डोसा ते अंडा भुर्जी असं वैविध्य असलेले बर्गर्स आणण्याच्या तयारीत आहे. मॅकडीच्या क्रांतिकारी मेन्यूने तरुणवर्गाला ब्रेकफास्टमध्ये पर्यायांची विविधता मिळणार आहे. सकाळच्या वेळेत ग्राहकांना खेचून आणण्यासाठी हा बदल करण्याचा कंपनीचा मानस आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळतील. येत्या वीकेंडला नवा मेन्यू मॅकडीमध्ये दिसण्याची चिन्हं आहेत. सुरुवात मुंबईपासून होईल, त्यानंतर हळूहळू देशभरातील मॅकडीच्या आऊटलेट्समध्ये हा 'नाश्ता' मिळेल. सोबक स्पिनच आणि कॉर्न ब्रोशे, प्लेन किंवा मसाला स्क्रॅम्बल्ड एग्ज, वॅफल्स, हॉटकेक्स हे पदार्थही ब्रेकफास्टला मिळतील. आरोग्यदायी न्याहारीसाठी तळलेल्या पदार्थांऐवजी ग्रिल्ड मेन्यू असेल. भारतीय ब्रेकफास्ट मार्केट काबीज करण्याचा हा प्रयत्न नसल्याचंही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. उडुपी किंवा इराणी रेस्टॉरंटशी ही थेट स्पर्धा नाही. मॅकडीमध्ये डोसा विकला जाणार नसून, त्या फ्लेव्हरचे बर्गर असतील, असं सांगण्यात आलं आहे. केएफसी, पिझा हट, बर्गर किंग, डॉमिनोज यासारख्या प्रतिस्पर्ध्यांना मात्र मॅकडीने आव्हान दिलं आहे. यापूर्वी डॉमिनोजने नवरात्रीच्या काळात उपवासाचे पिझा बाजारात आणले होते.
Published at : 11 Jan 2017 09:07 AM (IST) Tags: भारतीय

आणखी महत्वाच्या बातम्या

महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Amit Thackeray: सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Amit Thackeray: सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Amit Thackeray vs sada sarvankar: शिवतीर्थच्या पायरीपर्यंत जाऊन सदा सरवणकरांना रिकाम्या हाती माघारी का परतावं लागलं? वाचा माहीम विधानसभेची इनसाईड स्टोरी

Amit Thackeray vs sada sarvankar: शिवतीर्थच्या पायरीपर्यंत जाऊन सदा सरवणकरांना रिकाम्या हाती माघारी का परतावं लागलं? वाचा माहीम विधानसभेची इनसाईड स्टोरी

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"

नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं

टॉप न्यूज़

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार