एक्स्प्लोर

Lok Sabha Election 2024 : जागावाटपाआधीच महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर; दक्षिण मुंबईसाठीही काँग्रेस आग्रही, ठाकरेंसमोर पेच?

Maharashtra Politics: लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज होत असल्याचं चिन्हं आहे.

Lok Sabha Election 2024 : मुंबई : यंदाचं वर्ष निवडणुकांचं वर्ष असणार आहे. आगामी काळात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections 2024) सर्वच पक्षांनी आपापल्या परीनं तयारी सुरू केली आहे. अशातच अनेक पक्षांनी आपपले उमेदवारही जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडे (Maha Vikas Aghadi) सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा जागा वाटपासंदर्भात सर्वच पक्षांसह, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काहीसे हेवेदावे पाहायला मिळत आहेत. अशातच जागावाटपाआधीच काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) धुसफूस चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर पश्चिम लोकसभा जागेनंतर दक्षिण मुंबईसाठीही (South Mumbai) काँग्रेस आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुनच महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

लोकसभा जागा वाटपासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज होत असल्याचं चिन्हं आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यानंतर मुंबईतील काँग्रेसच्या आणखी एका नेत्यानं नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कुणीही सार्वजनिक वक्तव्यं किंवा दावे करू नयेत, असा थेट इशाराच मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिला आहे. यावरुन मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा जागेनंतर दक्षिण मुंबई जागेसाठीही काँग्रेस आग्रही असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात या दोन जागांवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले की, "महाविकास आघाडी साठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत. दक्षिण मुंबईच्या आणि इतर जागांवर शिवसेना चर्चेआधीच दावा करत असेल, तर काँग्रेससुद्धा या जागांवर दावा करून उमेदवार निश्चित करेल." 

पुढे बोलताना ते म्हणाले की, "माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला फोन करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी एकतर्फी दावा करत आहे.  त्यामुळे तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कुठल्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही. त्यांच्या एका प्रवक्त्यानं मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरुवात करायला सांगितली. गिरगावच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला आहे."

"मागील 50 वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो वा नसो लोकांची कामं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही, काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही, कोणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत, जर एखादा पक्ष औपचारिक चर्चेआधी जर अशा प्रकारे दावे करत असेल, तर काँग्रेससुद्धा जागांवर दावा करू शकते आणि उमेदवार देऊ शकते, मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल.", असं मिलिंद देवरा म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : MVA on Seats : दक्षिण मुंबईवर ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा,मिलिंद देवरा आणि ठाकरे गट आमने सामने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Hasya Kavi Sanmelan on Holi Festival | एबीपी माझा हास्य कवी संमेलन 2025 ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget