एक्स्प्लोर

Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना स्वयंचलित गन मिळणार नाही, जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Jaipur Express Firing : ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे (Automatic Gun) मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर (Jaipur Express Firing) खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अखेरचा निर्णय आणि सर्क्युलर रेल्वे बोर्डाकडून येणं बाकी आहे. 31 जुलैला मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंहने केलेल्या गोळीबारात (Firing) चौघांचा मृत्यू झाला होता. चेतन सिंहने AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती.

कर्मचाऱ्यांना हलकी हत्यारे देण्याचा निर्णय

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारच्या घटनेनंतर आता सेंट्रल आणि वेस्ट रेल्वेने ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या जवानांना  AK47 किंवा AR गन यांसारखे स्वयंचलित हत्यारे देण्याऐवजी हलकी हत्यारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेकडून हा निर्णय सध्या विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. परंतु यावर अखेरचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार असून त्यानंतर सर्क्युलर जारी होईल. 

संवेदनशील ठिकाणी आवश्यकतेनुसार डिप्लॉयमेंट

परंतु आता सामन्य मार्गावरील ट्रेनमध्ये कर्मचाऱ्यांकडे अशी ऑटोमॅटिक हत्यारं नसतील. मात्र जे संवेदनशील ठिकाणं आहे, जिथे नक्षलवादी किंवा इतर प्रकारच्या गुन्हेगारांद्वारे ट्रेनला लक्ष्य केलं जाण्याची शंका असते तिथल्या मार्गांवर आवश्यकतेनुसार डिप्लॉयमेंट असेल.

चेतन सिंहच्या सहकाऱ्यांची विभागीय चौकशी होणार

दुसरीकडे ट्रेनमधील गोळीबार प्रकरणात आरोपी आरपीएफ शिपाई चेतन सिंह याच्यासोबत उपस्थित असलेल्या दोन आरपीएफ जवानांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चेतनने गोळीबार केल्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी घाबरुन स्वत:ला टॉयलेटमध्ये बंद करुन घेतलं होतं, 

तर RPF सूत्रांच्या माहितीनुसार, चेतनने आपल्या आजाराबद्दल विभागाला कोणतीही माहिती दिली. त्याच्यावर मानसिक आजाराबाबत उपचार सुरु असल्याची माहितीही त्याने दिली नव्हती.

एकामागोमाग चार जणांचा जीव घेतला

आरपीएफ शिपाई चेतन सिंहने त्याचे वरिष्ठ असलेल्या एएसआय टिकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांना गोळ्या घालून जीव घेतला. बी-5 कोचमध्ये टिकाराम मीणा, बी-4 कोचमधील मोहम्मद हुसेन बुरहानपूरवाला, पँट्री कारमध्ये असलेल्या सय्यद सैफुल्लाह मोईनुद्दीन असगर अब्बास शेख यांचीएकामागोमाग हत्या केली. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास मीरा रोड स्थानकाजवळ प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. यावेळी आरोपीने खाली उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जीआरपीने त्याला पकडलं.

त्या रात्री कोण कोण होते ड्युटीवर?

मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये त्या रात्री ASI टिकाराम मीणा (वय 58 वर्षे), पोलीस हवालदार नरेंद्र परमार (वय 58 वर्षे), शिपाई अमेय आचार्य (वय 26 वर्षे) आणि शिपाई चेतन सिंह (वय 33 वर्षे) ड्युटीवर होते. या सर्वांची 28 जुलैपासून एक आठवड्याभर मेल पॅसेन्जर गाड्यांवर एस्कॉर्टिंग करण्याची ड्युटी नेमलेली होती. रविवारी रात्री नऊच्या दरम्यान सौराष्ट्र मेल या ट्रेनमधून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी एक्सॉर्ट करत सूरतपर्यंत गेले आणि सूरतवरुन जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने एक्सॉर्ट करत मुंबईला येत होते तेव्हा हा प्रकार घडला. 

हेही वाचा

Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करणारा आरोपी चेतन सिंह खरंच मानसिक आजारी? रेल्वे मंत्रालयाने म्हटले..

मृत्युंजय सिंह हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांना पत्रकारितेचा 18 वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ABP News मध्ये डे. ब्युरो महाराष्ट्र म्हणून कार्यरत आहेत. शिवाय एबीपी माझा या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीसाठीही ते सखोल वार्तांकन करतात. गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर सखोल रिपोर्टिंग करण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संरक्षण विषयांतही विशेष रुची आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget