News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

सुधाकर शिंदेंना सरकारचं अभय, अविश्वास प्रस्ताव निलंबित

सुधाकर शिंदे यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव राज्य शासनाने निलंबित केला आहे. सुधाकर शिंदे यांची बदली होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

FOLLOW US: 
Share:
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी भाजपने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या विरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव राज्य शासनाने निलंबित केला आहे. सुधाकर शिंदे यांची बदली होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसाठी हा धक्का मानला जात आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन दीड वर्ष झालं आहे. पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची वर्णी लागली. पण महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजप नगरसेवक आणि आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पटेनासं झालं होतं. आयुक्त कोणत्याच प्रकारची नागरी कामं करत नसल्याचा आक्षेप सत्ताधारी भाजपाने घेतला. कचरा प्रश्न, पाणी, सार्वजनिक भूखंड, मैदानं या महत्वाच्या कामात आयुक्तांना अपयश आल्याचं कारण देत भाजपाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. भाजपाच्या 50 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर  शेकाप आघाडीच्या 22 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. संबंधित बातम्या :

पनवेल मनपा आयुक्त सुधाकर शिंदेंविरोधात अविश्वास ठराव पास

पनवेल महापालिका आयुक्तांवर भाजप अविश्वास ठराव आणणार!

Published at : 12 Apr 2018 06:53 PM (IST) Tags: Sudhakar Shinde सुधाकर शिंदे अविश्वास ठराव पनवेल महानगरपालिका Panvel Municipal Corporation भाजप BJP

आणखी महत्वाच्या बातम्या

मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसतोच कसा? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल

मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसतोच कसा? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Jaykumar Gore : मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम, सातारा पोलीस अधीक्षकांची हायकोर्टाकडून कानउघडणी

Jaykumar Gore : मायणी कोविड घोटाळा प्रकरणी जयकुमार गोरे यांच्या अडचणी कायम, सातारा पोलीस अधीक्षकांची हायकोर्टाकडून कानउघडणी

Asaduddin Owaisi : बनारसमध्ये नरेंद्र मोदींना कमी मतदान झालं, तिथे धर्मयुद्ध होतं की व्होट जिहाद? असदुद्दीन ओवेसी यांची सडकून टीका 

Asaduddin Owaisi : बनारसमध्ये नरेंद्र मोदींना कमी मतदान झालं, तिथे धर्मयुद्ध होतं की व्होट जिहाद? असदुद्दीन ओवेसी यांची सडकून टीका 

टॉप न्यूज़

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका