MNS Shivsena Alliance : मोठी बातमी! दादरचा तिढा सुटला, मराठीबहुल भागासाठी ठाकरे बंधूंचे जागावाटप अंतिम टप्प्यात
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : मराठीबहुल दादर, माहीम, भांडुप, विक्रोळी, शिवडीमधील अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यावर चर्चा होऊन जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई : राज्याचं लक्ष लागून असलेल्या ठाकरे बंधूंच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती आहे. शिवडीनंतर महत्त्वाच्या असलेल्या दादरचाही तिढा सुटला आहे. दादरमधील ज्या दोन वॉर्डवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेस सुरू होती त्यावर आता एकमत झालं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादरमधील प्रभाग क्रमांक 192 ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर प्रभाग क्रमांक 194 मनसेकडे जाणार असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
दादरमधील प्रभाग क्रमांक 192 आणि 194 मध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी दावा केला होता. त्यानंतर यामधील एका प्रभागात ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार तर दुसऱ्या प्रभागात मनसेकडून उमेदवार दिला जाणार आहे. शिवसेना 192 मध्ये तर 194 मध्ये मनसे लढणार असल्याची माहिती आहे.
MNS Shivsena Seat Sharaing : जागावाटप आजच पूर्ण करणार
मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू युती करणार हे निश्चित झालं असून येत्या एक-दोन दिवसात त्याची घोषणा केली जाणार आहे. युती लवकर जाहीर करायची आहे. त्यासाठी काही जागांवरुन जो पेच सुरू आहे तो आजच सोडवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे.
Mumbai Shivadi Seat Sharing : शिवडीचा पेच सुटला
शिवडीमधील 3 प्रभागांवरून अडलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवडीतील 2 जागा ठाकरेंच्या सेनेला, तर एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर भांडूपच्या वॅार्ड क्रमांक 114 वरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे.
ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहे तिथे रस्सीखेच सुरू आहे. त्यावरून जिथे पेच निर्माण झाला आहे तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून सोडवला जात आहे. जागावाटपाचा तिढा सुटल्यानंतर ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करणार आहेत.
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : जास्त ताणू नका, राज ठाकरेंच्या सूचना
नगरपरिषदांच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकांचे वेध राज्याला लागलेत. ठाकरे बंधूंच्या युतीआधी जागावाटपाच्या चर्चा जोरदार दोन्ही पक्षात सुरू आहेत. त्याची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती लागली आहे. मराठीबहुल मतदारसंघांसाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे.
दादर विभागातील काही जागांची मागणी मनसेनं केली होती. तर ठाकरेंची शिवसेनाही या जागांसाठी आग्रही आहे. त्याचसोबत शिवडी, माहीम, भांडुप, विक्रोळी या मतदारसंघातील जागांचाही तिढा होता.
मराठीबहुल भागातील वॉर्डसाठी दोन्ही पक्ष आग्रही असल्याचं आहेत, मात्र त्यावर अधिक ताणू नका अशा सूचना राज ठाकरेंनी दिल्याची माहिती समोर आली आहे. मनसे नेत्यांसह राज ठाकरेंनी या सूचना संजय राऊत आणि अनिल परब यांनाही केल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. रविवारी सामनाच्या कार्यालयात झालेल्या चर्चेची माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या पक्षप्रमुखांना दिल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:
























