एक्स्प्लोर
Advertisement
नाट्य कथेच्या सेन्सॉरशिपविरोधात अमोल पालेकर हायकोर्टात
मुंबई: नाट्य कथेसाठी प्रस्तावित सेन्सॉरशिपविरोधात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नाटकाची कथा महाराष्ट्र सादरीकरण छाननी मंडळाकडून सेन्सॉर करून घेणे बंधनकारक केले जाणार आहे. मात्र ही कृती मुलभूत अधिकारावर गदा आणणारी आहे. त्यामुळे ऐतिहासिक कथांची नाट्य निमिर्ती होऊ शकणार नाही, असे त्यांनी यासंदर्भात म्हटले आहे.
मुळात सादरीकरणात येणारे अडथळे, कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. यासाठी पोलिसांकडून नाटकांसाठी परवाना दिला जातो. त्यामुळे स्वतंत्र सेन्सॉरशिपची आवश्यकता नाही, असा दावाही याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
या याचिकेवर येत्या काही दिवसांत मुख्य न्यायाधीश मंजुळा चिल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement