Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत आगमन, असा असेल दौऱ्याचा कार्यक्रम
Amit Shah On Mumbai Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असून, आज ते महत्त्वाच्या बैठका आणि भेटी-गाठी घेतील. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट महत्त्वाची आहे.
मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल (Amit Shah On Mumbai Visit) झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केलं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे 'मिशन मुंबई पालिका' सुरु झालं असून अमित शाह यांची भेट त्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचं सांगितलं जातंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महत्त्वाच्या बैठका घेणार असल्याची माहिती आहे. आज सकाळी साडे दहा वाजता ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणार आहेत. बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते त्यांच्या नियोजित बैठकांना उपस्थित राहतील.
असा असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दौरा
- सकाळी 9 वाजता- अमित शाह दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेणार आहेत.
- सकाळी 10 वाजता- सह्याद्री गेस्ट हाऊसवरुन लालबागकडे रवाना होतील.
- सकाळी 10.30 वाजता- अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचतील.
- सकाळी 11 वाजता- लालबागचा राजाहून वांद्राकडे प्रयाण.
- सकाळी 11.15 वाजता- वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाला भेट देतील
- दुपारी 12 वाजता- देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.
- दुपारी 2 वाजता- सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.
- दुपारी 2.15 वाजता- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.
- दुपारी 3.35 वाजता- नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.
- संध्याकाळी 5.50 वाजता- मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण
अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, त्यामध्ये विविध पोलिस दलाचा समावेश आहे.
- मुंबई पोलिस दलसह वाहतूक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी.
- राज्य राखीव पोलीस दल
- क्विक रिस्पॉन्स टीम
- बॉम्ब शोध व निकामी पथक
- रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ही दंगल आणि गर्दी नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष शाखा आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकाची सुरुवात केली जाणार आहे.