एक्स्प्लोर

Amit Shah Mumbai visit : अमित शाह मुंबई दौऱ्यावर, पोलीस सतर्क, अतिरिक्त दल तैनात

Amit Shah Mumbai visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.

Amit Shah Mumbai visit : देशाचे गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत असल्याने त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत अतिरिक्त पोलिस दल तैनात केला असून पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

गृहमंत्री अमित शाह आज रात्री 9.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील. मग सोमवारी सकाळी नऊपासून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. ज्यात ते लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. 

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच वेगवेगळ्या चौक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस दलाची साप्ताहिक सुट्टी रद्द करण्यात आली असून, गणेश उत्सव झाल्या आठवड्याच्या शेवटी व्यवस्थापित केली जाईल.  दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाही बंदोबस्ताचा भाग होण्यास सांगितले आहे. शाह यांचे शहरात आगमन होण्यापूर्वी सायंकाळी 4 वाजल्यापासून मुंबईभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळणार आहे.

शाह यांच्या मुंबई दौऱ्यात तैनात करण्यात आलेल्या विविध पोलिस दलाचा समावेश आहे.

- मुंबई पोलिस दलसह वाहतूक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी. 

- राज्य राखीव पोलीस दल

- क्विक रिस्पॉन्स टीम

- बॉम्ब शोध व निकामी पथक

- रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) ही दंगल आणि गर्दी नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष शाखा आहे.

देशाचे गृहमंत्री मुंबईत येतायेत..त्यामुळे स्वाभाविकच मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे...अमित शहांचा हा दौरा आगामी महापालिका निवडणूक आणि सध्याच्या शिंदे-फडणविस सरकारच्या पुढील वाटचालीकरताही महत्वाचा मानला जातोय. 

अमित शाहांचा मुंबई दौरा कसा?
अमित शाह 5 तारखेला प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणपतीचं दर्शन घेतील. याशिवाय सिद्धिविनायकाच्या चरणीही लीन होतील. तसंच अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknat Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या गणपतीचे दर्शन घेणार आहेत. विशेष म्हणजे यादव यादरम्यान येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होईल. गेल्या पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होईल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget