एक्स्प्लोर

शाह-फडणवीसांची बैठक, शिवसेनेशी जाहीर वाद टाळण्याची भूमिका?

तब्बल अडीच तास या बैठकीस यावेळी मुख्यमंत्र्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार हे महत्वाचे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकत्रित भोजनही घेतलं.

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांमध्ये काल उशिरा रात्री सह्याद्री अथितीगृहावर बैठक पार पडली. तब्बल अडीच तास या बैठकीत खलबतं झाली. तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत जाहीर वाद टाळण्यावर या बैठकीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या दौऱ्याचं आयोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यात झालेल्या पराभवानंतर भाजपचं नेतृत्व जोमानं कामाला लागलं आहे. तब्बल अडीच तास या बैठकीस यावेळी मुख्यमंत्र्यासह केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, आशिष शेलार हे महत्वाचे नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकत्रित भोजनही घेतलं. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवार राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. विशेषत: तीन राज्यातील सत्ता गेल्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबद्दल तूर्तास तरी पक्षाने जाहीर वाद टाळत सामोपचाराने भूमिका घेण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. त्यासोबतच लोकसभा मतदारसंघांबाबतही विभागवार चर्चा झाली. इतर राज्यातील ग्रामीण भागात भाजपला निवडणुकीत बसत असलेला फटका, राज्यातील दुष्काळी परिस्थती, तसेच मध्य प्रदेश आणि छ्त्तीसगड या राज्यातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी विषयी या बैठकीत चर्चा झाली. राज्य आणि केंद्र सरकाराने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याविषयीही सर्वोतपरी प्रयत्न केले जावेत. तसेच विरोधकांच्या टीकेला आक्रमकपणे उत्तर देण्याचेही या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपने लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली असून बैठकींचे सत्रही वाढले आहे. लोकसभेत राज्याच्या 48 जागा असल्यानं राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र भाजपकरता महत्त्वाचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी कालच मुंबई पुण्यात मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन एकप्रकारे निवडणुकींचं बिगूल फुंकलं आहे. आज मुख्यमंत्री भाजप आमदारांची बैठक घेत राज्यभरातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget