एक्स्प्लोर
Advertisement

(Source: Poll of Polls)
अडीच वर्षांच्या अवीर जाधवची कमाल, 208 देशांची माहिती तोंडपाठ
अंबरनाथमध्ये सध्या एका लीटिल मास्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, अवघ्या अडीच वर्षांच्या या चिमुरड्यानं आपल्या नावावर 6 रेकॉर्ड्स कोरले आहेत. अवीर जाधव असं या चिमुरड्याचं नाव असून, त्याला तब्बल 208 देशांची माहिती तोंडपाठ आहे.

कल्याण : अंबरनाथमध्ये सध्या एका लीटिल मास्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, अवघ्या अडीच वर्षांच्या या चिमुरड्यानं आपल्या नावावर 6 रेकॉर्ड्स कोरले आहेत. अवीर जाधव असं या चिमुरड्याचं नाव असून, त्याला तब्बल 208 देशांची माहिती तोंडपाठ आहे.
मुळचा पुण्याचा असलेल्या अवीरला फक्त देशच नाही, तर त्यांच्या राजधानी, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रभाषा हे सर्व तोंडपाठ आहे. आपल्या अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर अवीरनं इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्सवर नाव कोरलं आहे.
वास्तविक, अवीर 11 महिन्यांचा असल्यापासूनच त्याची स्मरणशक्ती विलक्षण असल्याचं त्याची आई सांगते. त्याच्या याच स्मरणशक्तीच्या जोरावर त्याने शाळेत जायच्या आधीच आपल्या नावावर सहा विक्रम आहेत.
तुम्ही फक्त नाव सांगायची खोटी, देशाचं नाव ऐकताच अवीरच बोट बरोबर त्या देशाच्या नावावर जातं. त्याची ही बैद्धिक प्रतिभा पाहून मुख्यमंत्रीही अचाट झाले होते. कारण, मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी अवीरनं युरोपातील सर्व देशांची नाव अगदी अचूक सांगितली, आणि सर्वांनाच भांबवून सोडलं.
अवीरला पुढे जाऊन काय करायचं हे अजून त्यालाही कळत नसेल. पण हा छोटा पॅक बडा धमाके मोठा होऊन नक्कीच काहीतरी धमाकेदार करेल, यात शंका नाही.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
भविष्य
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
