(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नये यावर सर्वपक्षीयांचे एकमत!
इम्पेरिकल डेटा (Empirical Data) गोळा होपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नये यावर सर्वपक्षीयांचे एकमत झाले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC Reservation आज सर्वपक्षीय बैठक पार पडली.
मुंबई : स्थानिक स्वराज्यातील निवडणुकांमधील ओबीसींचे आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत जोपर्यंत इम्पेरिकल डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या यावर सर्वांचे एकमत झाले आहे. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नयेत : फडणवीस
बैठकीत जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आम्ही मांडली. मागच्या बैठकीतही आम्ही काही मुद्दे मांडले होते. यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद आला आहे. राज्य मागासा आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करुन आणि ट्रिपलटेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितलीय. त्यानुसार कारवाई केली तर आपल्याला ओबीसीच्या जागा आपल्याला वाचवण्यता येतील. तरीही चारपाच जिल्ह्यात अडचण होईल. मात्र, इतर जिल्ह्यात काही अडचण येणार नाही. म्हणजे जवळपास साडेचार हजार जागा आपल्याला वाचवता येतील. आता आम्ही तात्काळ इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागास आयोगाला विनंती करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे.
राज्य मागास आयोगाला हा डेटा गोळा करण्याचे सांगण्यात यावे. जोपर्यंत डेटा गोळा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये, यावर आमचे एकमत माझ्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 85 टक्के जागा यामुळे वाचणार आहेत. आणि नंतर पुन्हा 15 टक्के जागा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पुढील तीनचार महिन्यात इम्पेरिकल डेटा गोळा करण्यात यावर सर्वांचे एकमत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आयोगाने सध्या जो फंड हवाय तो द्यायला हवा.
केंद्राने इम्पेरिकल डेटा दिला तर काम सोपं होईल : भुजबळ
ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली आहे. एकाच वेळेला आम्ही तीनचार पद्धतीने प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डेटा आहे. तो मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात भूमिका मांडली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण 50 टक्केपर्यंत निवडणूक घेऊ शकतो का? यावर काही निर्णय घेता येईल का? यावरही विचार सुरु आहे. याचवेळी तीनचार महिन्यात इम्पेरिकल डेटा आपल्याला तयार करता येईल का? यासाठीही आयोगाशी आम्ही चर्चा करणार आहोत. हा डेटा येईपर्यंत निवडणूक पुढे ढकलता येईल का? यासंदर्भातही चर्चा सुरु आहे.
निवडणुका पुढे ढकलण्यावर एकमत : वडेट्टीवार
इम्पेरिकल डेटा गोळ्या संदर्भात आमची चर्चा झाली. दुसरं असं की ओबीसीच्या जागा ठेऊन निवडणुका घेता येईल का? तिसरं असं की इम्पेरिकल डेटा येईपर्यंत निवडणूक गोळा करता येईल का? या तीन मुख्य मुद्द्यावर चर्चा झाली. या बैठकीत इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात यावर एकमत झाल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.