एक्स्प्लोर
ड्रग्ज तस्करांकडून एके-56 आणि दोन पिस्तुल जप्त
ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली. या चौकशीनंतर अंडरवर्ल्ड कनेक्शनही समोर आलं आहे.

ठाणे : ड्रग्ज विकायला आलेल्या दोघांकडून ठाण्यात पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात एका एके 56 रायफलसह दोन पिस्तुल आणि तब्बल 108 काडतुसांचा समावेश आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली.
ठाणे शहरात कोकेन विकायला आलेल्या जाहीद अली शौकत काश्मिरी आणि संजय बिपीन श्रॉफ या दोघांना गुरुवारी खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडून जवळपास दीड लाख रुपयांचं कोकेन हे महागडं ड्रग्ज जप्त करण्यात आलं.
या दोघांच्या चौकशीत त्यांच्याकडे शस्त्रास्त्र असल्याची बाब पोलिसांना समजली. त्यानुसार गोरेगावला राहणाऱ्या यास्मिन खान हिच्या फ्लॅटवर धाड टाकत पोलिसांनी एका एके 56 रायफलसह दोन पिस्तुल आणि 108 काडतुसं हस्तगत केली.
यावेळी यास्मिन खान हिलादेखील अटक करण्यात आली. यास्मिन खानचा पती नईम फईम खान हा दाऊद टोळीचा हस्तक असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात ड्रग्ज आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्यानंतर आता येत्या काळात तपासात आणखी काही महत्त्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
