एक्स्प्लोर

आशिष देशमुखांची मुंबईत भेट घेणार: अजित पवार

आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य कसं वाटलं? पार्थ निवडणूक लढणार का? अशा विविध मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं.

मुंबई: जनतेचा रोष सोडा, इथे आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, समाधानी कोणीच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  दिली. राजीनामा दिलेले भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांची मुंबईत आल्यावर भेट घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते. आशिष देशमुखांनी राजीनामा का दिला? राफेल डीलवरचं शरद पवाराचं वक्तव्य, पार्थ निवडणूक लढणार का? अशा विविध मुद्द्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. आशिष देशमुखांची भेट घेणार भाजपचे नागपूरमधील काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “सत्ताधारी पक्षातले आमदार राजीनामे देत आहेत. मग जनतेत किती रोष असेल हे दिसून येतं. आमदार-खासदार राजीनामे देत आहेत, शेतक-यांवर हल्ला होत आहे. इथे समाधानी कोणीच नाही. भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आशिष देशमुखांची मुंबईत आल्यावर भेट घेणार आहे, असं अजित पवार म्हणाले. शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास “राफेल व्यवहारप्रकरणी शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. कालच्या सभेत पवारांनी थेट भाष्य केलं. राफेल डील प्रकरणावर पवारांनी थेट सवाल उपस्थित केले आहेत”, असं  अजित पवारांनी स्पष्ट केलं. गैरसमजातून अन्वरांचा राजीनामा खासदार तारिक अन्वर यांनी गैरसमजातून राजीनामा दिला आहे, पवारांशी त्याचे थेट आणि घरोब्याचे संबंध आहेत, असं  अजित पवार म्हणाले. पार्थ पवार राजकारणात येणार का? आताची पीढी मोठी झाली आहे, आपला निर्णय स्वत: घेत असतात, काम करताना स्थानिक कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेतलं जातं. मी मागे बोललो होतो, माझ्या मुलांनी राजकाराणात येऊ नये, पण आता जग बदलत चाललं आहे. तरुण पीढ़ी स्वत:चे निर्णय स्वत: घेत असतात, आपण कोणावर निर्णय लादू नये. जर कोणी निर्णय घेत असेल, तर आपण त्यांना रोखूही शकत नाही, असं अजित पवारांनी नमूद केलं. संबंधित बातम्या भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा  मुलगा पार्थ लोकसभा निवडणूक लढणार का? अजित पवार म्हणतात...  

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

Embed widget