एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai, Pune Air Quality: सुटकेचा निश्वास! मुंबई, पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी सुधारली, अवकाळीमुळे दोन्ही शहरं समाधानकारक श्रेणीत

Air Quality Mumbai, Pune: मागील अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत दिसत होती, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं होतं.

Mumbai, Pune Air Quality: मुंबई : मुंबई (Mumbai News) आणि पुण्यातील (Pune News) हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल (गुरुवारी) मुंबईसह उपनगरांत आणि पुण्यातील काही भागांत कोसळलेला पाऊस फायदेशीर ठरल्याची माहिती मिळत आहे. काल झालेल्या पावसामुळे  मुंबई आणि पुणे हवा गुणवत्ता पातळीत समाधानकारक श्रेणीत आले आहेत. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी (Air Quality) 94 वर तर पुण्यातील 82 वर आहे. 

मागील अनेक दिवसांपासून मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी मॉडरेट श्रेणीत दिसत होती, ज्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं दिसून आलं होतं. मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महापालिका आणि एमपीसीबीकडून विविध उपाययोजना, ज्याचा देखील परिणाम हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा होण्यास पाहायला मिळाला. तर, पुढील 48 तास मुंबईतील हवा गुणवत्ता पातळीत सुधारणा दिसेल. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा त्यात भर पडत प्रदूषित वातावरण दिसू शकतं, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. 

मुंबई आणि उपनगरातील हवा गुणवत्ता पातळी (एक्यूआय)

शहरं एक्यूआय
भांडूप  85
कुलाबा 66
मालाड  73
माझगाव  103
वरळी 53
बोरवली  99
बीकेसी 127
चेंबूर  73
अंधेरी  75
नवी मुंबई  102

पुणे आणि उपनगरातील हवा गुणवत्ता पातळी (एक्यूआय) 

शहरं एक्यूआय
पाषाण 43
शिवाजीनगर  127
लोहगाव  83
आळंदी  57
कात्रज  46
हडपसर  113
भोसरी 79
निगडी 89
भुमकर चौक 89
कौथरुड  95

राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमधील परिस्थिती (एक्यूआय) 

शहरं एक्यूआय
अकोला 123
अमरावती 134
छत्रपती संभाजीनगर  133
भिवंडी  56
चंद्रपूर  156
धुळे  173
जळगाव  130
जालना  130
कल्याण 86
कोल्हापूर  104
लातूर  97
मिरा भाईंदर  88
नागपूर  180
उल्हासनगर 85
नाशिक 102
सोलापूर 55

राज्याचा श्वास कोंडला. प्रदूषणाने सर्वच शहरं हैराण झाली आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक झाली. प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत. बांधकाम साईट्सवर स्मॉग गन स्प्रिंकलर्स लावा, एमएमआरडीएच्या बांधकाम साईट्स धूळमुक्त करा, शहरात झाडांची जास्तीत जास्त लागवड करा, रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबईत विशेष पथकं तयार करा, वॉटर टँकरची संख्या वाढवा, मुंबईतले रस्ते पाण्याने धुवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. मुंबईत तातडीनं याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र प्रदूषणाची समस्या मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यात आहे. विविध महापालिकांनीही आता हा विषय गांभीर्यानं घेत तातडीनं उपाययोजना केल्या आहेत. 

मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी 

मुंबई उपनगरात अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप , मुलुंड, गोवंडी अशा सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळतो आहे. या अवकळी पावसानं मुंबईकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे दिवाळी साठी खरेदीला किंवा भेटी गाठी घेण्यास बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Unseasonal Rain: राज्यभरात अवकाळीची अवकृपा! मुंबई, ठाण्यासह उपनगरांतही कोसळधार; ऐन दिवाळीत खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget