एक्स्प्लोर

Air pollution : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी; मुंबईतील हवेची गुणवत्ता मात्र बिघडली

Air Pollution in Mumbai : दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असताना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता मात्र बिघडली आहे.

Air Pollution Rises in Diwali 2022 : लक्ष्मीपूजनाच्या (Laxmipujan) दिवशी आतषबाजीमुळे (Fireworks) मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या आतषबाजीमुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक खालवला आहे. शिवाय येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता (Air Quality Index) आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशभरात फटाके फोडत मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी करण्यात आली. मात्र याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होणार आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत आहे.

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फोडलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक 300 वर सर्वाधिक वाईट स्थितीत आहे. सोबतच मुंबईतील बीकेसी, मालाड आणि माझगावमधील हवा गुणवत्ता स्तर देखील वाईट स्थितीत आहे. मुंबईतील हवा गुणवत्ता अतिशय वाईट स्थितीत जाण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाच्या निर्बंधात दिवाळी साजरी केली असताना फटाक्यांवरही निर्बंध होते यामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) मध्यम पातळीवर होता. पण पावसाळ्यात स्थिर असलेला हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक दिवाळी सुरु होताच खाली घसरला आहे.

फटाक्यांचा आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता बिघडली

संपूर्ण पावसाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक स्थिती होता. पण पावसाचे प्रमाण कमी होताच आणि दिवाळीतील आतिषबाजीमुळे हवा गुणवत्ता खालवली आहे. मुंबईतील सरासरी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI)145 वर आहे. भांडूप येथे एक्यूआय (AQI) 91, कुलाबा 111, मालाड 204, माझगाव 200, वरळी 53, बोरिवली 94, बीकेसी 208, चेंबूर 156, अंधेरी 193, नवी मुंबई 300 वर आहे. हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे वायु प्रदूषणास संवेदनशील असणाऱ्या नागरिकांना आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे.

सोमवारी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 06.53 ते 08.16 वाजेदरम्यान होता. या दरम्यान मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झालं. परिणामी हवेची गुणवत्ता ढासळली. दोन वर्षानंतर आलेली निर्बंधमुक्त दिवाळी नागरिकांनी उत्साहात साजरी केली. यामुळे हवेची गुणवत्ता मात्र ढासळली. हवेची ढासळलेली लहान मुले, हृदयरुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget