एक्स्प्लोर
एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी, विमानतळांच्या सुरक्षेत वाढ
एअर इंडियाच्या कंट्रोल रुमला एका व्यक्तीने निनावी कॉल करुन एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंबईसह देशभरातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे
![एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी, विमानतळांच्या सुरक्षेत वाढ Air India receives plane hijack threat call, Airports put on high alert एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी, विमानतळांच्या सुरक्षेत वाढ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/08/03115729/Air-india.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : एअर इंडियाच्या कंट्रोल रुमला एका व्यक्तीने निनावी कॉल करुन एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी दिली. त्यानंतर मुंबईसह देशभरातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कॉलने मुंबई विमानतळाच्या कंट्रोल रुमसह विमानतळ प्रशासनाच्या कार्यालयामध्ये गोंधळ उडाला होता. पोलीस याचा तपास करत असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, रायगडमध्ये एसटीमध्ये मिळालेल्या बॉम्बनंतर आणि मुंबईतील गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शनिवारी एका निनावी कॅलद्वारे एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सर्व विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह इतर शहरातील विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने एअर इंडियाच्या कंट्रोलरुमला फोन केला. फोनवर त्याने एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी दिली. या कॉलनंतर सीआयएसएफने(Central Industrial Security Force)विमानतळावरील सुरक्षा वाढवली आहे. तसेच मुंबई पोलीस आणि क्राइम ब्रँचची टीम धमकी देणाऱ्या फोनचा व फोन करणाऱ्याचा तपास करत आहेत. या फोननंतर विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून तपासणी केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)