एक्स्प्लोर

आपला पगार किती, बोलता किती? 'फेकूचंद' उल्लेखावरुन पडळकरांचा राऊतांना टोमणा

'सामना'च्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'फेकूचंद' असा केल्याने पडळकरांनी संजय राऊत यांना पत्रातून उत्तर दिलं आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती असा टोमणा पडळकरांनी मारला आहे.

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखात गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख 'फेकूचंद' असा केल्याने पडळकरांनी उत्तर दिलं आहे. आपला पगार किती? आपण बोलता किती असा टोमणा पडळकरांनी मारला आहे. आपल्या पक्षाचे खासदार पंतप्रधान मोदींच्या भरवशावर निवडून आलेले आहेत हे विसरलात का? पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची आपली लायकी आहे का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले आहेत. तसचं धनगर आणि भटक्या समाजासाठी आपली लेखणी किती झिजवली याचंही उत्तर द्या असं पडळकर म्हणाले.

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनोखं आंदोलन केलं होतं. विधानभवानासमोर ढोल वाजवून केलेलं पडळकरांचं आंदोलन लक्षवेधी ठरलं होतं. या आंदोलनावर टीका करताना 'सामना'च्या अग्रलेखात गोपीचंद यांचा उल्लेख 'फेकूचंद' असा करण्यात आला होता.

पडळकरांची एबीपी माझाला प्रतिक्रिया या पत्राविषयी गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाला सविस्तर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी संजय राऊतांना खालच्या भाषेत बोलणार नाही. गोरगरीब समाजासाठी, आरक्षणासाठी, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नासाठी पेहराव करुन विधानभवनासमोर ढोल वाजवण्यासाठी मला संजय राऊतांना, त्यांच्या पक्षा किंवा सरकारला विचारण्याची गरज नाही. राज्यघटनेनेच मला तो अधिकार दिला आहे. मी एक वेळा नाही हजार वेळा ढोल वाजवेन. त्यांनी मला तुरुंगात धाडण्याची भाषा केली. पण त्यांना माझा इतिहास माहित नाही. मी अनेक वेळा लोक आंदोलनासाठी तुरुंगात जाऊन आलो आहे. मी समाजासाठी अनेकवेळा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. त्यामुळे मला धमकी देण्याचं कारण नाही. तुम्ही 'सामना'मधून लोकांच्या हितासाठी किती लिहिता? तुमच्या लेखणीतून महाराष्ट्रामध्ये कोणतं हित घडलंय. शांततेत निघालेल्या मराठा मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणता. तुमच्या पत्रकारितेतून घेण्यासारखं काही आहे का? दररोज विरोधकांवर खालच्या भाषेत टीका करायची. तुम्ही महाराष्ट्राचं व्हिजन लिहा ना. धनगर आरक्षणाबाबत, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांसाठी कधी लिहिलं सामनात? उठसूठ मोदींवर टीका करायची. मातोश्रीचं खायचं आणि गोविंदबागेचं गायचं असले उद्योगधंदे त्यांनी बंद करावेत. मी विधानभवानासमोर अनेक आंदोलनं करणार, धमक असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावं."

पडळकरांनी पत्रात काय लिहिलं? "मी आपणास खरेतर शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा, असे उब्दोधन देऊन लिहू शकलो असतो. परवाच्या 'सामना'च्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख 'फेकूचंद' पडळकर असा केला. या पद्धतीने आपला उल्लेख मलाही करता आला असता पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे, प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आई-वडिलांनी दिला. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण आणि भटक्या समाजाच्या प्रश्नासाठी झिजवली? सगळं लक्ष मुंबईच्या नाईटलाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार? संजय राऊतजी, आपला पगार किती आणि पण बोलता किती? आपल्या पक्षाचे जेवढेही खासदार निवडून आले ते भाजपच्या, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भरवश्यावर निवडून आलेले आहेत याचा इतका लवकर विसर पडला आपल्याला? पंतप्रधान मोदींवर वाट्टेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? उठसूठ कोणत्याही विषयावर आणि व्यक्तीवर काहीही बोलण्याचे आपल्याला मातोश्रीतून मिळाले की बारामतीच्या गोविंदबागेतून मिळाले हे महाराष्ट्राला कळू द्या."

Gopichand Padalkar wirtes to Sanjay Raut | राऊतजी, आपला पगार किती, बोलता किती? : गोपीचंद पडळकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget