एक्स्प्लोर

मुंबई पोलीस दलाचे अश्वदल तब्बल 88 वर्षांनी कार्यरत

मुंबई पोलीस दलात तब्बल 88 वर्षांनी अश्वदल कार्यरत होत आहे. गर्दीवर नजर ठेवणे, गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी अश्वदलाचा उपयोग होऊ शकतो.

मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होतं. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. आता 88 वर्षांनी हे युनिट सुरु होतं आहे. इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे अश्वदल होतं. 26 जानेवारी पासून हे युनिट सुरु होणार आहे. या दलामध्ये 30 घोडे असणार आहेत. सध्या मुंबई पोलिसांनी 13 घोडे विकत घेतले असून अजून 17 घोडे विकत घेण्याचा प्रस्ताव आहे. 26 जानेवारी रोजी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात 11 घोडे सहभागी होणार आहेत.

घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवता येते. त्यामुळे आंदोलन, जमाव नियंत्रित करण्यासाठी हे अश्वदल महत्वाचं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घोड्यावरून येणारे पोलीस हे आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज करणार नाहीत. मात्र घोडे आले की गर्दी आपोआप बाजूला होते, हे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

अश्वदलाचा ताफ्यातील अधिकारी, कर्मचारी

या अश्वदलात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असणार आहेत. या घोड्यावरील घोडेस्वारांना वाकिटॉकी देण्यात येणार असून समुद्र किनारी दोन घोडे ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा मानस आहे. मरोळ येथे या घोड्यांना ठेवण्यासाठी पागा तयार करण्यात येणार आहे. सध्या त्यांची तात्पुरती व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात येणार आहे. मरोळ येथील पोलीस मैदानावर घोडेस्वारांचं प्रशिक्षण अन्य सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर नजर ठेवणे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशा कामांसाठी अश्वदलाचा नक्कीच जास्त उपयोग होईल. याशिवाय मुंबई पोलिसांचं हे अश्वदल येत्या काळात मुंबईकरांचा आकर्षणही ठरू शकतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget