एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या विकासासाठी खुप काम करु, खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मंत्रिमंडळ विस्ताराच्या सहा दिवसांनंतर मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. चांगले लोक बरोबर आहे त्यामुळे चांगलं काम करता येणार आहे. मित्रपक्षांकडून खुप चांगले सल्ले मिळतील, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहाव्या दिवशी खातेवाटप जाहीर झालं आहे. आदित्य ठाकरे यांना खातेवाटपात पर्यावरण आणि पर्यटन मंत्रिपद देण्यात आलं आहे. चांगली लोकं सोबत आहेत, त्यामुळे चांगल काम करू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी खातेवाटपानंतर पहिली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

सरकारचं जे खातेवाटप झालं त्यामध्ये मला पर्यटन, पर्यावरण खातं मिळालं आहे. आवडीची खाती मिळाळी याचा आनंद आहे. या खात्यांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या विभागात महाराष्ट्रासाठी खुप काम करण्याची संधी आहे. सर्वांच्या सूचनेनुसार काम करीन. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करु, याची खात्री आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार सोबत आहे. चांगले लोक बरोबर आहेत, त्यामुळे चांगलं काम करता येईल. मित्रपक्षांकडून खुप चांगले सल्ले मिळतील, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

खातेवाटपाची अधिकृत यादी

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती अजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन

कॅबिनेट मंत्री

सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्क जयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास  नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता  अनिल देशमुख - गृह  बाळासाहेब थोरात - महसूल राजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासन राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण हसन मुश्रीफ - ग्राम विकास  डॉ.नितीन राऊत - उर्जा वर्षा गायकवाड - शालेय शिक्षण डॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण एकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण विजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण दादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याण संजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन  गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता  ॲड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास  संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन बाळासाहेब पाटील - सहकार, पणन अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य अस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास यशोमती ठाकूर - महिला व बालविकास शंकराराव गडाख - मृद व जलसंधारण धनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य सतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण शंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन बच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार दत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन डॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget