Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा 'मस्तमौला' अंदाज; वाद्य वाजवण्याचा आनंद लुटला, व्हिडीओ चर्चेत
Aditya Thackeray Playing Drum : आमदार आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यामध्ये त्यांचा 'मस्तमौला' अंदाज पाहायला मिळत आहे.
Aaditya Thackeray Playing Drum : नेहमी राजकारणामुळे चर्चेत असलेले शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आता त्यांच्या 'मस्तमौला' अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. आदित्य ठाकरे यांचा वाद्य वाजवताना व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांनी वाद्य वाजवतानाचा एक व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य ठाकरेंचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे वाद्य वाजवतात तेव्हा...
आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील जुहू चौपाटी येथील‘बिर्ला लेन’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे ठाकरे यांना ड्रम वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी जुहू येथे वाद्य वादनाचा आनंद घेतला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बिर्ला उद्यानात जुहूवासीयांची भेट घेतली आणि तिथे सुरु असलेल्या आफ्रिकन जेंबे वाद्यप्रकार वाजवण्याचा (Djembe Instrument) आनंद घेतला.
View this post on Instagram
खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या निधीतून बिर्ला लेनचे सुशोभिकरण
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या खासदार निधीतून मुंबईतील जुहू चौपाटी (Juhu Beach) येथे बिर्ला लेनचे (Birla Lane) सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडलं.
राज्यसभा खासदार @priyankac19 जी यांच्या खासदार निधीतून सुशोभीकरण करण्यात आलेल्या जुहू चौपाटी येथील बिर्ला लेन रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमास आज उपस्थित होतो.यावेळी तेथेच जवळच्या बिर्ला उद्यानात जुहूवासीयांची भेट घेतली व तिथे सुरु असलेल्या अफ्रिकन जेंबे वाद्यप्रकाराचा आनंद घेतला. pic.twitter.com/XZqazWGs9B
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 6, 2023
महत्त्वाच्या इतर बातम्या