एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट, कृष्णा हेगडे भाजपात
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंग जोरात सुरु आहे. मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकाधिकार कंटाळून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं हेगडे यांनी सांगितलं.
सोबतच बॉलिवूड अभिनेते दलिप ताहिल यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवाय अनेक बॉलिवूड अभिनेते येत्या काळात भाजपमध्ये येतील, असं कृष्णा हेगडे यांनी सांगितलं.
कृष्णा हेगडे यांनी विलेपार्ले मतदार संघातून काँग्रेसचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांचा भाजपप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण त्यांचा पश्चिम उपनगरांत काँग्रेसच्या मतदारांसोबत तगडा संपर्क आहे.
काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट : कृष्णा हेगडे
काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट देण्यात येत आहेत. मी जन्मापासून काँग्रेसमध्ये होतो, माझे वडील 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. पण संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी राजीनामा देतोय, असं कृष्णा हेगडे यांनी सांगितलं.
वरीष्ठ नेते सुद्धा निरुपमांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्षश्रेष्ठींनाही याबाबतीत कळवलं आहे. मात्र निरुपम आपल्या कार्यपद्धतीत बदल करत नाहीत. असंच राहिलं तर काँग्रेसचे फक्त 25 नगरसेवक निवडून येतील, असंही कृष्णा हेगडे म्हणाले.
कृष्णा हेगडे यांची ओळख
2009 साली काँग्रेसकडून विलेपार्ले मतदारसंघातून आमदार
पश्चिम उपनगरांत काँग्रेसच्या मतदारांसोबत तगडा संपर्क
आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघात अनेक कामे तडीला नेल्याने मतदारांमधे चांगली छबी
मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता म्हणून काम
मुंबई हाऊसिंग बोर्डाचे सदस्यही म्हणून काम
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय समजले जातात. 2005 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.
2013 साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निरिक्षक म्हणून त्यांनी काम पार पाडले.
महाविद्यालयात असताना एनएसयूआयमध्ये सक्रीय कार्यकर्ते
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement