एक्स्प्लोर

किरीट सोमय्यांवरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची, शिवसेनेचं स्पष्टीकरण

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सोमय्या यांच्यावरील कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे.

मुंबई :  महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi) नेते आणि मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करण्याचा सपाटाच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी लावला आहे. काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर कोल्हापूरला निघालेल्या सोमय्या यांची पोलिसांकडून अडवणूक करण्यात आली, धक्काबुक्की करण्यात आली असा आरोप सोमय्यांनी केला. आज पत्रकार परिषेदत बोलताना सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. यावेळी त्यांनी ठाकरे यांना सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असं म्हटलं.

मात्र ही सोमय्या यांच्यावरील ही कारवाई मुख्यमंत्री कार्यालयाची नाही तर गृह मंत्रालयाची आहे, असं स्पष्टीकरण शिवसेनेनं दिलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सोमय्या यांनी  आमच्या मंगळावर,चंद्रावर जाऊन पाहणी करावी. लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आरोप करायचे तर करु द्या. आरोप करणं हे फॅशन झाली आहे. कळेल त्यांना आमचा रंग कोणता आहे. मी या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं त्याचा मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

राऊतांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्र्यावर आरोप करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री अशा लहान गोष्टीत पडत नाही. कोणी खोटे नाटे आरोप केले तर आमच्या सरकारला भोकं पडत नाहीत. तुमच्याकडे पुरावे असतील तर महाराष्ट्रात पोलीस आहे. तुम्ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर त्यांच्या यंत्रणांमार्फत प्रेशर करत असतील तर ते योग्य नाही, असं ते म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, याला नाट्य म्हणणं चुकीचं आहे. तो रंगभूमीचा अपमान ठरेल. महाराष्ट्रात मराठी नाटकाला परंपरा आहे. केंद्राच्या पाठबळावर महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. कालची कारवाई गृहमंत्रालयाची आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री! पुढील आठवड्यात पाहणी करणार

हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावल्यानंतर आता सोमय्या यांच्या रडारवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले आहेत. आज कराडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

सोमय्या यांनी म्हटलं की,  मी गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार आहे, तिथेही असाच घोटाळा आहे. पुढच्या सोमवारी 27 तारखेला उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये 19 बंगल्यांचा घोटाळा केलाय, त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहे. तर 30 तारखेला अजित पवारांनी बेनामी कारखाना जरंडेश्वर हा विकत घेतला, त्याची पाहणी करणार आहे. त्यावेळीही मला रोखणार आहे का?, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे. 

हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला

गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याशी मुश्रीफ यांचा काय संबंध आहे? असा सवाल करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील ईडी कारवाईच्या भीतीनं माझ्यावर कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या विरोधातील सर्व पुरावे ईडीला देणार आहे, असंही सोमय्या यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे उद्या ईडी आणि इनकम टॅक्स विभागाकडे देणार आहे. या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मी मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच उघडकीस आणणार आहे, असंही सोमय्या म्हणाले. 

नेमका काय केला आहे आरोप

सोमय्या म्हणाले की, 2020 साली कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट बिलिंग न होता, हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई ते या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत. या कंपनीत 7185 शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, 998 मतीन हसीनचे, तर 998 गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे 98  टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे आहेत. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी 2019-20 मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.  कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं.

Kirit Somaiya : घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही : किरीट सोमय्या

घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार

हसन मुश्रीफांमुळे मला अंबाबाईचं दर्शन करता आलं नाही. ठाकरे सरकार हे घोटाळे उघडकीस आणणाऱ्याला अटक करणारं सरकार आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. पोलिसांनी मला कोणत्या आदेशाअंतर्गत मला गणेश विसर्जनापासून रोखलं. मला काल सहा तास कोंडून ठेवण्यात आलं. मी हात जोडून विनंती केली की ऑर्डर दाखवा. पुराव्यासह मी कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार होतो पण मला अडवलं गेलं, असंही ते म्हणाले. सीएसएमटी स्टेशनवर मला पोलिसांनी धक्काबुक्की देखील केली. मुंबईबाहेर जाण्यापासून रोखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश मला पोलिसांनी दाखवले, असंही सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्विकारावी, असं ते म्हणाले. सत्तेसाठी तुम्ही हिरवा रंग धारण केला असेल. उद्धव ठाकरे सरकारचा उद्धटपणा आम्ही चालून देणार नाही, असंही ते म्हणाले. पोलिसांच्या विरोधात आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचंही ते म्हणाले. माझ्यावर हल्ला व्हावा ही सरकारची इच्छा आहे का? असा सवालही ते म्हणाले. 

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी विनंती केल्यानंतर किरीट सोमय्या कराडमध्ये उतरले. कराडमध्ये किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान सोमय्या यांच्या आरोपानंतर आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget