एक्स्प्लोर

अल्पवयीन मुलीच्या डोळ्यात मिरची पूड फेकणारा गजाआड

एका अल्पवयीन मुलीच्या डोळ्यात विकृतानं मिरची पूड टाकल्याची घटना ठाणे शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत बारकाईनं तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या.

ठाणे : एका अल्पवयीन मुलीच्या डोळ्यात विकृतानं मिरची पूड टाकल्याची घटना ठाणे शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत बारकाईनं तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपी मुलीला ओळखतही नसल्याचं चौकशीत समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. ठाण्यातील चरई परिसरात २५ एप्रिल रोजी डान्स क्लासहून घरी परतत असलेल्या एका १६ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यात एका विकृतानं मिरची पूड फेकली होती. मिरची पूड डोळ्यात गेल्यानं तिला असह्य वेदना झाल्या होत्या. त्यानंतर तो विकृत तरुण तिथून शांतपणे चालत-चालत ठाण्याच्या तलावपाळीला गेला. तिथे त्यानं बोटिंगही केली. मात्र, यावेळी कुणीही या आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता. या घटनेनंतर मुलीला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तब्बल ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. त्याच्याआधारे पोलिसांनी या विकृताची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासची चक्र फिरवत आरोपीच्य मुसक्या आवळल्या. आरोपीचं नाव अब्दुल समद नूरमहंमद शाखानी असून त्याला मुंब्रा भागातून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, कोणतंही कारण नसताना आरोपीनं हा प्रकार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. या सगळ्या प्रकारानंतर अब्दुलने यापूर्वीही असे काही प्रकार केलेत का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत. मात्र, हे सगळं प्रकरण उघड झाल्यावर ठाण्यासारख्या शहरातही मुली सुरक्षित नाहीत, हे अधोरेखित झालं आहे. त्यामुळं मुलींनी आता अधिक सजग राहण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
Embed widget