एक्स्प्लोर
मला पोर्तुगालला परत न्या : अबू सालेमची कोर्टात धाव

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमनं युरोपीयन कोर्टात धाव घेतली आहे. सालेमनं पोर्तुगालला परत नेण्याची मागणी केली आहे.
मुंबईतील 1993च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात टाडा विशेष न्यायालयाकडून सालेमला दोषी ठरवण्यात आलं आहे. कोर्ट उद्या त्याला शिक्षा सुनाणार आहे.
अबू सालेमला 1993 च्या स्फोटात सालेमवर कट रचणे, हत्या आणि टाडाअंतर्गत दोषी ठरवण्यात आलं आहे.
याआधीच सालेमनं युरोपीयन कोर्टात धाव घेऊन पोर्तुगालला परत नेण्याची विनंती केली आहे. 2014 साली सालेमचं पोर्तुगालमधून काही अटींसह प्रत्यार्पण झालं होतं. त्यावेळी झालेल्या करारानुसार अबू सालेमला फाशी किंवा 25 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकणार नाही.
त्यामुळे सालेमचं पुढे काय होईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान अबू सालेमनं युरोपीयन कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत, आपल्यावर भारतात बेकायदेशीर कारवाई होत असून, त्याला ठेवण्यात आलेली तुरुंगातल्या जागेचीही तक्रार केली आहे.
नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहातल्या अशा खोलीत ठेवण्यात आलंय, जिथे सूर्यप्रकाश अजिबात येत नाही, असं त्याने याचिकेत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
