एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/02/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/02/2018
1. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यासह 6 सनदी अधिकाऱ्यांची बदली, मुंढे आता नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळणार https://goo.gl/ckBDSu
2. कोरेगाव-भीमा हिंसाचारातील आरोपी मिलिंद एकबोटेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, 20 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर https://goo.gl/XVjwux
3. सीडीआर लीक प्रकरणात पोलिसांचा मदतनीस अजिंक्य नागरगोजे ठाणे पोलिसांच्या ताब्यात, तर खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी https://goo.gl/1NVKTQ
4. रायगडच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह रायगडवासियांच्या नाराजीचा फटका https://goo.gl/ZLkF49
5. 2004 ला माझ्या नेतृत्त्वात जिंकूनही मला मुख्यमंत्र्याऐवजी राज्यपाल केलं, हा राजकीय कट असल्याचे कळल्यावर हाय कमांडकडून केंद्रीय ऊर्जामंत्रिपदी वर्णी, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट http://abpmajha.abplive.in/
6. नंदुरबारमधील MTDC चं रिसॉर्ट बेकायदेशीररित्या पर्यटनमंत्री जयकुमार रावलांच्या ताब्यात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा गंभीर आरोप https://goo.gl/LEAYZf
7. माध्यमिक शाळेत कोयत्याचे वार करुन वर्गमित्राची हत्या, दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना अटक, पंढरपूरमध्ये मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना https://goo.gl/vaSbBf
8. ICU रुममधून उडी मारुन रुग्णाची आत्महत्या, नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालयातील घटना, आजारपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आंदाज https://goo.gl/WmRGSG
9. मुंबईत मंत्रालयाबाहेर 25 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, कृषी अधिकारीपदाची परीक्षा दिल्यानंतर सरकारने निर्णय न घेतल्याने अविनाश शेटे हतबल, सुदैवाने अविनाश सुखरुप https://goo.gl/aBgoYt
10. पृथ्वीनं फक्त खेळण्यावर लक्ष द्यावं, घराच्या चिंतेने त्याला त्रस्त होऊ देणार नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं आश्वासन, मातोश्रीवर पृथ्वी शॉ-उद्धव ठाकरे भेट https://goo.gl/yPBBVr
11. वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेलाच नसता, लोकसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, तर मोदींच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ https://goo.gl/GZ6S72
12. भारतीय मुस्लिमांना 'पाकिस्तानी' म्हणणाऱ्यांना तीन वर्षांसाठी तुरुंगात टाका, खासदार असदुद्दीन ओवेसींची कायदा करण्याची मागणी https://goo.gl/UCDju5 तर मुस्लिमांनी भारतात राहू नये, पाकिस्तान किंवा बांगलादेशात जावं, भाजप खासदार विनय कटियारांचं वक्तव्य https://goo.gl/Fpw6ZY
13. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील निलंबित अधिकारी नितीश ठाकूरला दुबईमध्ये अटक, राज्यमंत्री शिव प्रताप शुक्लांची राज्यसभेत माहिती, ठाकूरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु https://goo.gl/j1WYgu
14. राजस्थानमध्ये पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या कारला अपघात, डोकं आणि हाताला किरकोळ दुखापत, जशोदाबेन यांची प्रकृती ठीक https://goo.gl/eWWNhf
15. अनुष्का शर्माच्या 'परी- नॉट अ फेरीटेल'चा झोप उडवणारा टीझर लॉन्च, लग्नानंतरचा अनुष्काचा पहिला सिनेमा 2 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार https://goo.gl/TFwef9
माझा विशेष : मुसलमानांना ‘पाकिस्तानी’ म्हटल्यास शिक्षा व्हावी? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर..
VIDEO BLOG : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा व्हिडीओ ब्लॉग – खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली https://goo.gl/DRMg5w
एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement