ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जून 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 16 जणांचा समावेश, 7 क्रू मेंबर्सचा समावेश https://tinyurl.com/3wnh847y पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदाबाद विमान अपघातस्थळी भेट;विध्वंसाचे दृश्य खूप दुःखद, मृत्यूचे शब्दात वर्णन करणे कठीण असल्याची भावना,मोदींकडून सिव्हील हॉस्पिटलमध्ये पीडितांची विचारपूस https://tinyurl.com/wn2x5dz7
2. माझ्या आजूबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे,प्रचंड घाबरलेलो होतो,उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो,अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या विश्वासकुमार रमेशची प्रतिक्रिया https://tinyurl.com/56rt8yrr मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, डोळ्यासमोर दोन एअर होस्टेस,काका-काकी जळत होते,बचावलेल्या प्रवाशाने नरेंद्र मोदींना जे पाहिलं ते सांगितलं https://tinyurl.com/j54s6368
3. एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा Black Box सापडला, अपघाताच्या कारणांचा उलगडा होणार, विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवला जाणार https://tinyurl.com/ynp8actf एकाच वेळी दोन्ही इंजिन निकामी होणं अविश्वसनीय, अपघातावेळी पायलटचं अखेरचं संभाषण महत्त्वाचं ठरणार,महाराष्ट्र सरकारचे माजी चीफ पायलट संजय कर्वे यांची माहिती https://tinyurl.com/ytz8e68y
4. अहमदाबाद विमान अपघातात डोंबिवलीच्या रोशनी सोनघरेचाही मृत्यू,केबिन क्रूचा होती भाग,वडील अन् भाऊ गुजरातला रवाना https://tinyurl.com/8afn2und रोशनी दहा बाय दहाच्या खोलीत राहिली, प्रचंड संघर्ष केला, रोशनी सोनघरेचे मामा प्रवीण सुखदरे भावूक https://tinyurl.com/4uyytffh
5. आपण लवकरच भेटू! विमानाच्या टेक ऑफआधी घरच्यांना केलेला फोन अखेरचा ठरला,एअर इंडियामध्ये सिनिअर ग्रुप मेंबर पदावर कार्यरत असणाऱ्या मुलुंडच्या श्रद्धा धवनचा मृत्यू https://tinyurl.com/mstdfb3t केबिन क्रू इरफान शेखचा विमानात दुर्घटनेत मृत्यू,ईदसाठी पिंपरीतील घरी येऊन गेला,परतलाच नाही https://tinyurl.com/yckxc5tk
6. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू,बोईंग 787-8 विमानं ग्राऊंड केली जाण्याची शक्यता, चौकशी अहवालानंतर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता https://tinyurl.com/5n8czaph डीजीसीएने एअर इंडियाला अनेक वेळा पत्र लिहून इशारा दिला होता, सुरक्षेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले गेले असावे, डीजीसीएचे माजी सहसचिव डॉ.सनत कौल यांचे सवाल https://tinyurl.com/bdh5unxe
7. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर मोठा एअर स्ट्राईक, लष्करी तळ आणि अणवस्त्र केंद्रांवर हल्ला, कमांडर्स अन् अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू https://tinyurl.com/37aa4xn7 इस्रायलनं इराणवर केलेल्या'एअर स्ट्राईक'मुळं भारतीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम, एअर इंडियाने 20 हून अधिक फ्लाईट्स वळवल्या https://tinyurl.com/2h49btzs
8. बीडमध्ये बालविवाहाची घटना उघड, पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह; पहिला नवरा पसार, तर दुसऱ्याला पोलिसांकडून बेड्या https://tinyurl.com/2sa5ny27
9. पुढील काही राज्यभरात पाऊस बरसत राहणार, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज, पेरण्या उरकून घेण्याचं आवाहन https://tinyurl.com/yrsj4et5 कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसानं सरनोबतवाडीतील ओढ्यातील पाणी वाढलं, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वाहून गेलेल्या 11 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला https://tinyurl.com/44m4a6bn
10. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 207 धावांवर संपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 281 धावांचं आव्हान https://tinyurl.com/27psussn
एबीपी माझा स्पेशल
बोईंगच्या अडचणी काय, विमान कसं कोसळलं, माजी चीफ पायलटकडून थरार ऐका! https://tinyurl.com/382mzed2
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























