ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 सप्टेबर 2025 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यभरात गणेश विसर्जनाची लगबग, मुंबईत 18 हजार पोलीस, 10 हजार कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर अन् पहिल्यांदाचा AI चा वापर; गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज https://tinyurl.com/2wjw2nu8 पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी 8 हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार, संशयितांवर ठेवणार करडी नजर https://tinyurl.com/45uc3ykj
2. तासाभरात दोन-दोन GR निघतात, मी गप्प बसणार नाही; एबीपी माझाच्या Exclusive मुलाखतीमध्ये मराठा आरक्षण निर्णयावरुन मंत्री छगन भुजबळांचा सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/44z957sw मी अन् देवेंद्रजी सत्तेचं ताम्रपट घेऊन आलो नाही, 10 वर्षांनी दुसरं कोणी येईल तेव्हाही कागद हेच राहतील ना; मराठा आरक्षण जीआरबाबत भुजबळांनी सांगितले संभाव्य धोके https://tinyurl.com/59vh7krw
3. लक्ष्मण हाकेंचं बारामतीत आक्रमक भाषण; म्हणाले, मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं कोणी म्हणलं तर त्याचं कानफाड फोडा https://tinyurl.com/3nxhnwf5 मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप https://tinyurl.com/5998mt6h
4. मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्याबद्दल कोण, काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही https://tinyurl.com/4acv3zp4 हैदराबाद गॅझेटियर जीआर आणि सगळे व्यवस्थित आहे, मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणात मिळणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/25dxzzzh
5. सोलापुरातील महिला IPS अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले, बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी मी कटिबद्ध https://tinyurl.com/m947kuf4 आधी अजित पवारांनी झापलं, आता आमदार अमोल मिटकरींची UPSC कडे चौकशीची मागणी; IPS अंजली कृष्णांच्या नियुक्तीवरच सवाल https://tinyurl.com/2n5d6kkc
6. राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा, CCMP कोर्स केलेल्या डॉक्टरांची MMC मध्ये नोंद होणार; सरकारच्या निर्णयाविरुद्ध IMA ची याचिका न्यायालयाने फेटाळली https://tinyurl.com/3sc3hxc7 लाडकी बहीणमधील अपत्रा 26 लाख लाभार्थ्यांचं स्क्रुटिनीनंतर काय होणार? आदिती तटकरेंनी म्हणाल्या, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील https://tinyurl.com/mm4vztn3
7. जळगावमध्ये शिवसेना शिंदेगटाचा नेता रहस्यमयरित्याबेपत्ता; जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरू https://tinyurl.com/mwbjb8yr DJ मुक्तीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता महिलेनं 7 व्या मजल्यावरुन स्वतःला झोकून दिलं; उबाठा गटाच्या जिल्हा प्रमुखासह पाच जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/mrx24dbk
8. कोल्हापुरातील गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, घरी येऊन आईच्या कुशीत विसावला; 10 वर्षाच्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू https://tinyurl.com/5rarkcjm डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला; नाशिकमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/ypyv76e8
9. ईडीने ऑनलाइन बेटिंग अॅप (1xBet) च्या प्रमोशन प्रकरणात शिखर धवनला घेरलं, ऑफिसमध्ये बोलवत तब्बल 8 तास प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण नेमकं आहे तरी काय? https://tinyurl.com/2s3746ps मुंबईत ग्राहक बनून पोलीसच मॉलमध्ये आले; उल्लूची अभिनेत्री अनुष्का मोनी मोहन दास चालवायची सेक्स रॅकेट; पोलिसांकडून रंगेहात अटक https://tinyurl.com/ysu66my7
10. नेपाळमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; सरकारच्या प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी न केल्यान मोठी कारवाई https://tinyurl.com/4459d8c9 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसले, 400 किलो RDX आणि 1 कोटी लोकांच्या मृत्यूचा दावा; मुंबईला 26/11 हून मोठ्या हल्ल्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर https://tinyurl.com/yhfhhu4d
*एबीपी माझा स्पेशल*
गुड न्यूज, पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार https://tinyurl.com/3fdbru56
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती अभ्यागत मंडळावर सुप्रिया सुळेंच्या ऐवजी खासदार सुनेत्रा पवारांची नियुक्ती https://tinyurl.com/275eks2s
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार; म्हणाले, नातवाला शाळेत जाण्यासाठी मोठं गिफ्ट https://tinyurl.com/4rnz4hzd
*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























